घरमुंबईअंधेरीतील सेव्हनहिल्स रुग्णालयासह इमारत पालिकेच्या ताब्यात

अंधेरीतील सेव्हनहिल्स रुग्णालयासह इमारत पालिकेच्या ताब्यात

Subscribe

सेव्हन हिल्स रुग्णालय आर्थिक संकटात सापडलेले असून रुग्णालयासोबत केलेला करार संपुष्ठात आणत हे रुग्णालय महापालिकेच्यावतीने ताब्यात घेण्यात येणार आहे.

अंधेरी पश्चिम येथील मरोळमधील रुग्णालयाची जागा सेव्हन हिल्स हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आल्यानंतर या रुग्णालयाकडून करारातील नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. मागील अनेक महिन्यांपासून सेव्हन हिल्स रुग्णालय आर्थिक संकटात सापडलेले असून रुग्णालयासोबत केलेला करार संपुष्ठात आणत हे रुग्णालय महापालिकेच्यावतीने ताब्यात घेण्यात येणार आहे. रुग्णालय इमारतीसह ७७ हजार ५५ चौरस मीटरची जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिका प्रशासनाने सुधार समितीला प्रस्ताव सादर केला आहे. परंतु, शेवटच्या क्षणाला हा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवल्यामुळे शिवसेनेच्या सदस्यांनी घेतलेल्या हरकतीनंतर समिती अध्यक्षांनी हा प्रस्ताव राखून ठेवला आहे.

१४०.८८ कोटी रुपये थकीत

मरोळ येथील महापालिका रुग्णालयाच्या इमारतीसह भूभाग सेव्हन हिल्स हॉस्पिटल लिमिटेड आणि सोमा इंटरनॅशनल या संयुक्त भागीदारीतील कंपनीला २००४ मध्ये देण्यात आला होता. त्यानंतर २० जानेवारी २००५ मध्ये जागेचा करार करण्यात आला आणि त्यानंतर १३ डिसेंबर २०१३ मध्ये महापालिकेसोबत केलेला सामंजस्य करार करण्यात आला होता. त्यानुसार महापालिकेच्या अटी व शर्तीनुसार सेव्हन हिल्स रुग्णालय सुरु होते. परंतु, सामजस्य करारातील अटींचा भंग केल्याने तसेच नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याने, या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला महापालिकेने २४ जानेवारी २०१८ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, याबाबत अ‍ॅक्सिस बँकेने हैद्राबादमधील नॅशनल कंपनी लॉ ट्ब्यिुनलमध्ये सेव्हनहिल्स हेल्थकेअर विरोधात इन्सॉल्वन्सी पेटिशन दाखल केले होते. यामध्ये महापालिकेला त्यांनी पक्षकार केले होते. यावेळी महापालिकेने सेव्हन हिल्सकडे मालमत्ता कर म्हणून ४७.९७ कोटी रुपये तर भाड्यापोटी ९२.९१ कोटी असे एकत्रित १४०.८८ कोटी रुपये थकीत असल्याचा दावा केला होता.

- Advertisement -

प्रशासनाने आणलेला तातडीचा प्रस्ताव सुधार समितीने ठेवला राखून

मात्र, याप्रकरणात न्यायालयात सुरु असलेल्या प्रकरणांप्रकरणी डॉ.बी.आर.शेट्टी यांनी महापालिकेची देयके अटी व शर्तीशिवाय न्यायालयात सादर केल्याप्रमाणे देण्याचे मान्य केले आहे. परंतु, ही प्रक्रीया सुधार आणि महापालिकेच्या मान्यतेशिवाय पार पडण्याची विनंती त्यांनी केल्यामुळे त्यांचा प्रस्ताव प्रशासनाने फेटाळून लावत त्यांना दिलेल्या नोटीसप्रमाणे रुग्णालयाची जागा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचा भाडेकरार आणि सामंजस्य करार हा सेव्हनहिल्स हेल्थकेअर यांच्यासोबत असल्याने, त्रयस्थ पक्षकारासोबत करार करण्याचे प्रावधान नियमांमध्ये नाही. त्यामुळे महापालिकेने तातडीने हे करार रद्द करण्यासाठी सुधार समितीच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वीचे आयुक्त अजोय मेहता व अतिरिक्त आयुक्त आय..कुंदन यांनी न्यायालयाच्या निर्देशानुसार शेट्टी यांच्या अटी मान्य करण्याची तयारी दर्शवली होती. परंतु विद्यमान आयुक्त प्रविणसिंह परदेशी आणि अतिरिक्त आयुक्त डॉ.अश्विनी जोशी यांनी मात्र, त्यांच्या अटी मानण्याची तयारी न दाखवता, उलट ही जागा ताब्यात घेण्यासाठी ते आग्रही आहेत. त्यामुळेच तातडीने त्यांनी हा प्रस्ताव मंजूर केला. परंतु शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये समन्वय नसल्याने हा प्रस्ताव राखून ठेवण्याची वेळ अध्यक्षांवर आली.

  • सेव्हन हिल्स रुग्णालयाचे एकूण क्षेत्रफळ : ७७,०५५ चौरस मीटर
  • भाडे पट्टयाचा कालावधी : ६० वर्षे
  • प्रकल्पाचा कालावधी : ६० महिने
  • महापालिकेकरता राखीव खाटा : २० टक्के
  • पहिल्या टप्प्यातील बांधकाम : ३०० खाटांचे रुग्णालय
  • दुसर्‍या टप्प्यातील बांधकाम : ५०० खाटांचे रुग्णालय
  • प्रकल्पाचा एकूण खर्च : १९६ कोटी रुपये
  • महापालिकेकडे असलेली एकूण थकबाकी : १४०.८८ कोटी रुपये


    हेही वाचा – लेखी आश्वासनानंतर बेस्ट संप तुर्तास मागे

    - Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -