घरमुंबईभविष्यात नरीमन पॉईंट, मंत्रालय परिसर ८० टक्के पाण्याखाली जाईल; पालिका आयुक्तांचा इशारा

भविष्यात नरीमन पॉईंट, मंत्रालय परिसर ८० टक्के पाण्याखाली जाईल; पालिका आयुक्तांचा इशारा

Subscribe

पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्रालयातर्फे मुंबई वातावरणीय बदल नियोजनाबाबतच्या वेबसाईट उद्घाटन करताना मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी इशारा दिला. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने दक्षिण मुंबईचा बराचसा परिसर २०५० पर्यंत पाण्याखाली जाईल. यामध्ये मुंबईची शान असलेला नरिमन पाँईट, मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या भागांचा समावेश असेल, असं आयुक्त म्हणाले.

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते २७ ऑगस्ट रोजी शुक्रवारी मुंबई हवामान बदल नियोजनाबाबतच्या वेबसाईटचं उद्घाटन झालं. याच कार्यक्रमात इकबाल सिंह चहल बोलत होते. यावेळी त्यांनी दक्षिण मुंबईतल्या ए, बी, सी आणि डी वॉर्डाचा ७० टक्के भाग हवामान बदलामुळे होणाऱ्या परिणामांमुळे पाण्याखाली जाईल, असा इशारा दिला.

- Advertisement -

निसर्ग इशारे देतोय

पालिका आयुक्तांनी निसर्ग इशारा देतोय पण नागरिकांना जाग येत नसल्याचं म्हटलं. नागरिक जागरुक झाले नाहीत तर परिस्थिती धोकादायक होईल, अशी भिती आयुक्तांनी व्यक्त केली. कफ परेड, नरिमन पॉईंट, मंत्रालय यासह ८० टक्के परिसर पाण्याखाली जाईल, म्हणजे गायबच होईल. २०५० म्हणजे २५-३० वर्ष फार लांब नाहीत, असं मुंबई महापालिका आयुक्तांनी म्हटलं.

दीड वर्षात तीन चक्रीवादळ

मुंबई किनारपट्टीवर ‘निसर्ग’ सारखं चक्रीवादळ १२९ वर्षांत पहिल्यांदा धडकलं. त्यानंतर मात्र गेल्या १५ महिन्यांत तीन चक्रीवादळं मुंबई किनारपट्टीवर आली. त्या पाठोपाठ गेल्या १५ महिन्यात तीन चक्रीवादळं आली. त्यामुळे ५ ऑगस्टला २०२० ला नरीमन पॉईंटला ५ ते ५.५ फूट पाणी साचलं होतं. इकबाल चहल म्हणाले त्यादिवशी चक्रीवादळाचा कोणताही इशारा नव्हता मात्र चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाली होती. वातावरणीय बदलांमुळे १७ मे रोजी मुंबईत २१४ पाऊस झाला होता, असही आयुक्तांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -