घरदेश-विदेशकृष्णजन्मावेळचा 'तो' दुर्लभ योग पुन्हा आलाय, असा होणार लाभ

कृष्णजन्मावेळचा ‘तो’ दुर्लभ योग पुन्हा आलाय, असा होणार लाभ

Subscribe

३० ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी जुळून येणार योग, मनोकामना होणार पूर्ण

द्वापर युगात भगवान श्रीकृष्णाचा जन्म ज्या दुर्मिळ योगावर झाला होता, तसाच योग ३० ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी जुळून येणार आहेत. या योगाचं वैशिष्ट्य म्हणजे या शुभकाळात कृष्णाची पूजा करणाऱ्यांची मनोकामना पूर्ण होणार असल्याचं ज्योतिषतज्ज्ञांचं मत आहे. या अनोख्या योगामुळे सर्वसामान्य भक्त आणि साधू-संत एकत्रच श्रीकृष्णाच्या उत्सवाचा आनंद घेणार आहेत. रविवारी (दि.२९) रात्री ११.२६ वाजता अष्टमीला सुरुवात होईल आणि ३० ऑगस्टला रात्री २ वाजेला अष्टमी संपेल.

द्वापर युगात भाद्रपद कृष्ण अष्टमी तिथी, बुधवारी रोहिणी नक्षत्रात, चंद्र वृषभ राशीत असताना श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. यंदा बुधवारऐवजी सोमवार आहे मात्र, इतर सर्व योग तसेच आहेत. सोमवारी (दि.३०) अष्टमी तिथीला सकाळी ६.३९ वाजता रोहीणी नक्षत्र सुरू होईल. चंद्र पूर्वसंध्येपासून तर सोमवारी सायंकाळपर्यंत वृषभ राशीत राहील. अष्टमीदेखील रात्री २ वाजून २ मिनिटांपर्यंत आहे. सोमवार हा चंद्र आणि महादेवाचा प्रभाव असलेला दिवस आहे. त्यामुळे जन्माष्टमीला हा दिवस अधिक फलदायी आणि लाभदायी असेल.

- Advertisement -

या वेळात आहे सर्वार्थ सिद्धी योग

यंदाच्या कृष्ण जन्माष्टमीवर सकाळी ६.२२ पासून ते रात्री १२.१६ पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग आहे. या दिवशी पूजा-पाठ, अनुष्ठान आणि प्रसादासोबतच देवतांच्या प्रतिमा, वस्त्र, श्रुंगार, आभूषण आणि सजावटीची सामुग्री खरेदी करणं फलदायी मानले जाते. अष्टमी आणि रोहिणी नक्षत्र एकाचवेळी येत असल्याने या दिवशी जयंती योगदेखील जुळून आला आहे.

म्हणून आहे दुर्मिळ योग, संततीप्राप्तीसाठीही लाभदायी

हे योग असताना जन्माष्टमीचे व्रत आणि श्रीकृष्णाची पूजा केली तर तीन जन्मांत झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते. तसेच, संततीप्राप्तीची इच्छा असलेल्यांनाही लाभ होतो. या दिवशी इच्छूक महिलांनी उपवास करावा. भगवान श्री कृष्णाचे बालरूप असलेल्या गोपालाची पूजा करावी. त्यानंतर पंचामृताने स्नान करावे आणि नवीन कपडे परिधान करून गोपाळ मंत्राचा जप करावा. यामुळे संतती प्राप्त होते, अशी भाविकांची धारणा आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -