घरमुंबईSSR death case: ड्रग्ज पेडलर रिगल महाकालला अटक; NCB ची कारवाई

SSR death case: ड्रग्ज पेडलर रिगल महाकालला अटक; NCB ची कारवाई

Subscribe

सुशांतसिंह प्रकरणी एनसीबीची मोठी कारवाई

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणा संदर्भात NCB कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील एनसीबीनं मिलत नगर, लोखंडवाला भागात छापेमारी केली असून फरार ड्रग्ज पुरवणाऱ्या रिगल महाकाल याला अटक केली आहे. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणि रोकडही जप्त करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

- Advertisement -

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील ही मोठी कारवाई असून फरार आरोपी रिगल महाकाल नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. महाकाल हा ड्रग्ज पुरवठादार असल्याची माहिती एएनआयनी दिली आहे. त्यानंतर त्याला आज कोर्टात हजर केले जाणार आहे.

दरम्यान, एनसीबीकडून असेही सांगण्यात आले की, ड्रग्ज प्रकरणातील दुसरा एक आरोपी अनुज केशवाणी याला महाकाल ड्रग्जचा पुरवठा करायचा. त्यानंतर केशवाणी पुढे दुसऱ्यांना हे ड्रग्ज पुरवत होता. NCB कडून बुधवारी सकाळी करण्यात आलेली कारवाई ही ओशिवरा भागातील मिलत नगर आणि लोखंडवाला येथे करण्यात आली. यादरम्यान, महाकाल याच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.


Forbes: जगातील प्रतिभावान महिलांमध्ये देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -