घरमुंबईज्याने पाकिस्तानला धोपटले, तो देशद्रोही कसा? जितेंद्र आव्हाडांचा सवाल

ज्याने पाकिस्तानला धोपटले, तो देशद्रोही कसा? जितेंद्र आव्हाडांचा सवाल

Subscribe

भारतरत्न आणि क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडूलकरने आजपर्यंत पाकिस्तानला क्रिकेटच्या मैदानात खूप धोपटले. पाकिस्तानसोबत शत्रूत्व असल्याप्रमाणे मैदानात आपला खेळ दाखवला तो सचिन आज काही लोकांसाठी देशद्रोही कसा काय ठरला? सचिन आजही पाकिस्तानला शत्रू मानतो. फक्त तो काही लोकांच्या विचारांचा नाही, म्हणून सचिनला देशद्रोही ठरवले जात आहे आणि इथेच लोकशाहीची हत्या होत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. “जे लोक आज सचिनवर टीका करत आहेत. त्यांनी देशासाठी स्वतः काय केले त्याचा पुरावा द्यावा. सचिनने जे केले ते करायला दहा जन्म पुरे पडणार नाही”, असेही आव्हाड म्हणाले आहेत.

- Advertisement -

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओत सचिन तेंडुलकरला ट्रोल करणाऱ्या लोकांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. “ज्याने शोएब अख्तरला कव्हर्सवरून सिक्सर ठोकला. वसीम अक्रमला मैदानाबाहेर फेकले. इम्रान खानच्या बॉलिंगवर तर हेल्मेट आणि पॅडशिवाय बॅटिंग केली. अशा अशक्यप्रय वाटणाऱ्या गोष्टी तेडुंलकरने लिलया केल्या.”

पुलवामा हल्ला पाकिस्तानने केला; पण RDX आले कसे मोदींनी उत्तर द्यावे – असदुद्दीन ओवैसी

“तुम्ही आमच्या विचारांचे नसाल तर तुमचे अस्तित्व आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका देशातील काही घटक घेत आहेत. बोलणाऱ्याला इतके घाबरवायचे की तो पुन्हा बोललाच नाही पाहीजे, अशी भीती ते लोक दाखवतात. इथेच लोकशाहीचा नाश होत आहे. नयनतारा सेहगल, अमोल पालेकर यांच्याप्रमाणेच आता सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांना गप्प केले जात आहे.”, असेही आव्हाड या व्हिडिओत म्हणाले आहेत.

- Advertisement -

का होतेय सचिन आणि सुनील गावसकर यांच्यावर टीका

पुलवामा हल्ल्यानंतर देशभरातून पाकिस्तानच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला जात आहे. आगामी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानसोबत सामना खेळू नये, असा एक मतप्रवाह तयार होत आहे. मात्र यात सचिनने आपले वेगळे मत प्रदर्शित केले होते. सचिन म्हणाला की, वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानसोबत आपण खेळलो नाही तर त्यांना दोन गुण फुकटचे मिळतील. त्यापेक्षा त्यांच्यासोबत सामना खेळून किक्रेटच्या मैदानात पाकिस्तानच्या चारी मुंड्या चित कराव्या, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली होती.

तसेच सुनील गावसकर यांनी देखील हेच मत व्यक्त केले होते. मात्र सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकरने आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका सुरु झाली आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने तर सचिनला अँटीनॅशनल ठरवून टाकले. त्यानंतर सोशल मीडियावरही त्याप्रमाणे टीका होऊ लागली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -