घरमहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेस संपवणं चिक्की खाण्या एवढं सोप्पं आहे का? - धनंजय मुंडे

राष्ट्रवादी काँग्रेस संपवणं चिक्की खाण्या एवढं सोप्पं आहे का? – धनंजय मुंडे

Subscribe

'जर तुम्ही खरच देवेंद्र गंगाधरराव फडणवीस असाल, तर त्या १६ मंत्र्यांच्या चौकशा करा, ज्यांची भ्रष्टाचारांची उघड आम्ही विधानसभा आणि विधानपरिषदेत केली', असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस संपवणं चिक्की खाण्या एवढं सोप्पं आहे का? असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना नाव न घेता विचारला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या निर्धार परिवर्तनाच्या जाहीर सभेत ते बोलत होते. ही सभा बीड जिल्हातील परळी येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते म्हणाले की, ‘कुठल्यातरी सभेत राज्याचे मुख्यमंत्री असतील, तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचा समारोप करतील असे आमच्या बहिनबाई बोलल्या. माझ्या बहिनबाईला एवढंच सांगायचं आहे की, अगं बाई राष्ट्रवादी काँग्रेस संपवणं चिक्की खाण्या एवढं सोप्प आहे का? ते भल्याभल्याला नाही जमलं. तुम्ही इथं म्हणताय समारोप? अरे समारोप कुणाचा? मागच्या निवडणुकीत केला ते माहित नाही? अरे या परळी तालुक्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सहापैकी सहा जिल्हा परिषद सदस्य आहेत की नाहीत? मग कुणाचा समारोप झाला? नगपालिकेच्या निवडणुकीत २७ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेचे या तालुक्यात निवडून आले. त्यामुळे समारोप कुणाचा झाला?’

‘आपला म्हणजे बाळा आणि दुसऱ्याचं म्हणजे कार्ट’

धनंजय मुंडे यांनी शनिवारी निर्धार परिवर्तनाच्या सभेमध्ये भाषण करताना मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी त्या सोळा मंत्र्यांच्या चौकशीच आदेश द्या ज्यांचे भ्रष्टाचार आम्ही विधानसभा आणि विधानपरिषदेत उघड पुरावाण्याशी हिंमत केले. पण, मुख्यमंत्री तसं करत नाहीत. ते अगोदरच क्लीन चीट देतात.’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण जर आमच्या नेत्यांना धमकी देत असाल तर राषट्रवादी काँग्रेस स्वस्त बसणार नाहीत, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं आहे. यावेळी ते म्हणाले की, ‘हिंमत असेल आणि जर खरच तुम्ही देवेंद्र गंगाधरराव फडणवीस असाल तर त्या १६ मंत्र्यांचे चौकशी करा ज्यांचे भ्रष्टाचार आम्ही विधानपरिषद आणि विधानसभामध्ये काढले.’

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -