घरमुंबईगांधी जयंतीचं औचित्य; भाजपविरोधात राष्ट्रवादीचं मूक आंदोलन!

गांधी जयंतीचं औचित्य; भाजपविरोधात राष्ट्रवादीचं मूक आंदोलन!

Subscribe

महात्मा गांधी यांच्या जयंती दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्रालयाच्या शेजारी मूक आंदोलन सूरू केलं. या आंदोलनाला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

एकीकडे आगामी लोकसभा निवडणुकांचं वातावरण तापलं असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधाऱ्यांविरोधात कंबर कसली आहे. भाजपप्रणीत युती सरकारच्या विविध धोरणांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने गांधी जयंतीचं औचित्य साधून निशाणा साधला आहे. यासाठी राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते मुंबईत आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. मात्र, त्यांचं हे आंदोलन कोणत्याही घोषणा किंवा नारेबाजीचे नसून मूक मूर्चा आंदोलन होते. राज्यभरात गांधी पुतळ्यांजवळ मूक बसून हे आंदोलन केले जाणार आहे.

तोंडावर बांधल्या काळ्या पट्ट्या

राज्यभराप्रमाणे मुंबईत मंत्रालयाजवळ महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ बसून राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी सकाळी मूक आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री आणि आमदार अजित पवार, आमदार छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांचा समावेश होता. यावेळी केंद्र-राज्य सरकारचं विविध मुद्द्यांवरचं धोरण, राज्याची आर्थिक-सामाजिक परिस्थिती, लोकशाही मूल्यांची पायमल्ली अशा मुद्द्यांवर भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. सकाळी ९ वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत हे मूक आंदोलन करण्यात आलं.

- Advertisement -

हेही वाचा – पवारांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर!


‘त्यांना लाज वाटली पाहिजे’

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आंदोलनावर सत्ताधाऱ्यांकडून टीका करण्यात आली आहे. भाजप आमदार आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या आंदोलनावर थेट निशाणा साधला आहे.

गांधीजींच्या विचारांवर त्यांना चालता तर येतच नाही. किमान त्यांच्या जयंतीच्या दिवशी तरी राजकारण करू नये. हे ज्यांना कळत नाही, ते गांधीजींचे खरे अनुयायी नाहीत. जे आंदोलनाला बसलेत, त्यांना लाज वाटली पाहिजे.

विनोद तावडे, शिक्षणमंत्री

- Advertisement -

‘आम्हाला बोलणारेच निर्लज्ज’

विनोद तावडेंच्या या टिकेला अजित पवार यांनीही लागलीच उत्तर दिलं. ‘जे आम्हाला लाज वाटण्यावर बोलतायत, त्यांनाच लाज वाटली पाहिजे’, असं अजित पवार म्हणाले आहेत.

काही जणं म्हणतायत आम्हाला लाज वाटली पाहिजे. पण हे वक्तव्य ज्यांनी केलं, त्या निर्लज्ज माणसालाच शरम वाटली पाहिजे. आम्ही शांतपणे आंदोलन करतो आणि हे लाज वाटण्याची भाषा करत आहेत. आज समाजातला एकही घटक समाधानी नाही.

अजित पवार, आमदार

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातल्या वाढत्या समस्यांचा जरी संदर्भ घेतला असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेस गांधी जयंतीचं राजकारण करत असल्याची टीकासुद्धा आता होऊ लागली आहे.


वाचा सविस्तर – खासदार तारिक अन्वर यांचा राष्ट्रवादीला रामराम! पवारांच्या राफेल वक्तव्यावर नाराजी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -