घरमुंबईराष्ट्रवादीची भूमिका विकासाच्या बाजूने, पर्यावरणाचा ऱ्हास नको - अजित पवार 

राष्ट्रवादीची भूमिका विकासाच्या बाजूने, पर्यावरणाचा ऱ्हास नको – अजित पवार 

Subscribe

मुंबई : रत्नागिरीतील राजापूर रिफायनरीसाठी (Rajapur Refinery) होणाऱ्या सर्वेक्षणाविरोधात आंदोलन चिघळले होते. गावकऱ्यांनी ब‌ॅरिकेट्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. हे आंदोलन आता स्थगित झाले आहे. या प्रकरणी विरोध पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, राष्ट्रवादीची भूमिका विकासाच्या बाजूने, पर्यावरणाचा ऱ्हास नको, असे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना वक्तव्य केले आहे.

अजित पवार म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री असताना स्वत: उद्धव ठाकरे यांच्याशी दिल्लीतून संपर्क साधण्यात आला होता. रिफायनरीसाठी जागा मान्य नसेल तर दुसरी जागा निवडा आणि तशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी पत्र दिलं आणि बारसू ही जागा निवडली गेली. वास्तविक मी पहिल्यापासून सांगतो आहे की, विकासाच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विरोध असण्याचे काही कारण नाही. पण कुठल्याही भागामध्ये विकास होत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही ही खबरदारी आपण सर्वांनी घेतलीच पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

त्यांनी सांगितले की, बारसू रिफायनरीप्रकरणी मी कालच रात्री जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांना मी सांगितले की, तिथल्या लोकांचा कोणत्या कारणाकरता विरोध आहे, ते पाहिले पाहिजे. कारण समृद्धी महामार्गाच्या वेळेस आम्हाला जागेचा योग्य मोबदला द्यावा. रेडिरेकनरच्या चारपट मोबदला द्या, पाचपट मोबादला द्या अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती. सरकारने पाचपट मोबदला दिल्यानंतर त्या जागा मिळायल्या लागल्या. मग तो विषय संपला आणि समृद्धी महामार्गाच बरच काम झालेले आपण पाहत असून राहिलेले कामही लवकरच होईल. तशाप्रकारे इथे आंदोलन होत आहे की, पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे म्हणून गावकरी आंदोलन करत हे सरकारने पाहिले पाहिजे, परंतु वास्तविक या प्रकल्पामुळे काही लाख लोकांना युवतींना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे याच्याबद्दल आता काही राजकीय पक्ष अस म्हणतात जनतेचा विरोध आहे म्हणून आमचा विरोध आहे. पण विकासाच्या बाबतीमध्ये जनतेचा कधीच विरोध नसतो, असे अजित पवार म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -