Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Live updates : मनोज सैनिक राज्याचे नवे मुख्य सचिव

Live updates : मनोज सैनिक राज्याचे नवे मुख्य सचिव

Subscribe

मनोज सैनिक राज्याचे नवे मुख्य सचिव


मनिष सिसोदिया यांना झटका, दिल्ली अबकारी धोरण मनी लॉंड्रिंग प्रकरणी जामीन नाकारला


- Advertisement -

बारसू आंदोलन ३ दिवस स्थगित करण्यात आले आहे.

बारसू रिफायनरीविरोधात आज स्थानिक आणि पोलिसांमध्ये झटपट झाली होती. बारसूमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे


- Advertisement -

सार्वजनिक नियुक्तींवर सकारी नियमांचे उल्लंघन केल्याचा अहवाल समोर आल्यानंतर बीबीसीचे अध्यक्ष रिचर्ड शार्प यांनी राजीनामा दिला आहे.


विनायक राऊत यांना पोलिसांनी सोडले

या रिफायनरीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या खासदार विनायक राऊत यांना आज अटक करण्यात आली. यानंतर पोलिसांनी विनायक राऊतांना सोडून दिले


शिंदे गटाचे नेते विनायक राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या रिफायनरीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या खासदार विनायक राऊत यांना आज अटक करण्यात आली.


बारसूतील आंदोलन आक्रमक

बारसूतील रिफायनरीच्या सर्वेक्षणाला स्थानिकांचा विरोध, आंदोलनकारी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली आहे.


जिया खान आत्महत्या प्रकरणात सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता


ठाकरे गटाची संपत्तीची शिवसेनाला देण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. वकील आशिष गिरी यांनी याचिका दाखल केली होती.


विठ्ठल मंदिर सरकारीकरणातून मुक्त करण्याच्या याचिकेवर आज सुनावणी

जेष्ठ विधिज्ञ डॉ. सुब्रमण्यम स्वामी  यांनी विठ्ठल मंदिर सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी मुंबई उच्य न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.


जिया खान आत्महत्या प्रकरणाचा निकाल आज येण्याची शक्यता कमी

जिया खान आत्महत्या प्रकरणाचा निकाल आज येण्याची शक्यता आहे. जियाच्या आईने आणखी काही मुद्दे मांडण्यासाठी वेळ मागितली आहे. यासाठी न्यायालयाने खटल्याची सुनावणी दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब केली आहे


संभाजीनगरमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन

मराठा आरक्षणाचा ओबीसीमध्ये समावेश करण्याची मागणी करण्यासाठी संभाजीनगरमध्ये मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन केले आहे


‘मविआ’ची १ मे रोजी होणारी सभा ही शेवटची असणार आहे, असे नितेश राणे म्हणाले


बारसूच्या लोकांचा सरकारवर विश्वास नाही – संजय राऊत

उद्धव ठाकरेंची चीड चीड योग्य आहे. सरकारने भू संपादन मागे घ्याला हवे. मविआ सरकारने जबरदस्ती केली नाही.


हवेलीच्या निवडणुकीत मतदारांचा गोंधळ घातला आहे. यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. नावाच्या यादी नावे नसल्याने गोंधळ घातला आहे.


पुणे शहरात पाऊसाला सुरुवात

पुणे शहरासाठी हवामान विभागाने ऑरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे.


नेपाळमधील भूकंपाचे दोन धक्के जाणवले; कोणतीही जीवितहानी नाही

नेपाळमधील बाजुरा येथील डहाकोट येथे गुरुवारी रात्री भूकंपाचे दोन धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४.८ आणि ५.९  इतकी होती. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.


राज्यातील १४७ कृषी बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज होणार मतदान

राज्यातील १४७ कृषी बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर ३० एप्रिलला मतमोजणी होणार आहे


SCO संरक्षण मंत्र्यांची आज बैठक, राजनाथ राजनाथ सिंह अध्यक्षस्थानी असणार

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या आजच्या बैठक होणार आहे. या बैठकीत प्रादेशिक शांतता, सुरक्षा, दहशतवादाला आळा घालणे आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. या बैठकीत प्रत्येक देश आपली बाजू मांडणार आहे.

 

 

 

 

- Advertisment -