घरताज्या घडामोडीभारतीय रेल्वेला 'या' स्थानकाच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई

भारतीय रेल्वेला ‘या’ स्थानकाच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई

Subscribe

भारतीय रेल्वे स्थानकांच्या सर्वाधिक कमाईची यादी समोर आली आहे. यामध्ये देशाची राजधानी दिल्ली स्थानक हे आघाडीवर असल्याचं समजतं. दिल्ली स्थानक वर्षाला सुमारे 2400 कोटी रुपयांची कमाई करत आहे. भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे जाळं आहे.

भारतीय रेल्वे स्थानकांच्या सर्वाधिक कमाईची यादी समोर आली आहे. यामध्ये देशाची राजधानी दिल्ली स्थानक हे आघाडीवर असल्याचं समजतं. दिल्ली स्थानक वर्षाला सुमारे 2400 कोटी रुपयांची कमाई करत आहे. भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे जाळं आहे. भारतीय रेल्वेने दररोज तब्बल 25 दशलक्ष प्रवासी प्रवास करतात. भारतीय रेल्वेचे देशभरातील 7000 स्थानकांतून 15000 रेल्वे गाड्या धावत आहेत. या स्थानकांमध्ये नवी दिल्ली स्थानक हे रेल्वेच्या कमाईमध्ये अव्वल स्थानी आहे.

भारतीय रेल्वेच्या या स्थानकावरून दरवर्षी सुमारे 367 कोटी लोक प्रवास करतात आणि रेल्वेला त्यांच्याकडून वर्षाला सुमारे 2400 कोटी रुपये कमाई होते. सर्वाधिक कमाई स्थानकांच्या यादीत नवी दिल्लीनंतर पश्चिम बंगालचे हावडा स्थानक क्रमांकावर आहे. 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत रेल्वेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, पश्चिम बंगालमधील हावडा स्टेशन रेल्वेच्या कमाईच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या स्थानकातून रेल्वेला दरवर्षी सुमारे 1330 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. नवी दिल्ली रेल्वे स्थानकापेक्षा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सुमारे 30 दशलक्ष अधिक आहे. हावडा येथून दरवर्षी ६.५७ प्रवासी प्रवास करतात.

- Advertisement -

चेन्नई सेंट्रल स्टेशन रेल्वेच्या कमाईच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येत असून, रेल्वेला दरवर्षी 940 कोटी रुपयांची कमाई होते. यासह मुंबईचे छत्रपती शिवाजी टर्मिनस 755 कोटींच्या कमाईसह सहाव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर मुंबईचे लोकमान्य टिळक टर्मिनस 752 कोटींच्या वार्षिक कमाईसह सातव्या क्रमांकावर आहे. गुजरातचे अहमदाबाद रेल्वे स्टेशन आठव्या क्रमांकावर आहे, जिथून रेल्वेला सुमारे 705 कोटींची कमाई होते. बंगळुरूच्या एसबीसी स्थाकातून रेल्वेला 650 कोटी इतकी कमाई होत असून हे स्थानक नवव्या क्रमांकावर आहे.

बिहारचे पाटणा जंक्शनही रेल्वे कमाईच्या बाबतीत अग्रेसर आहे. पाटणा जंक्शन स्थानकाच्या माध्यमातून रेल्वेची वार्षिक कमाई ४.३६ कोटींवर पोहोचली आहे. दानापूर स्थानकातून 2.01 कोटी रुपये आणि मुझफ्फरपूर जंक्शनकडून 1.77 कोटी रुपयांची रेल्वेला कामाई झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राणा दाम्पत्याच्या आरोपांचा पर्दाफाश

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -