घरमुंबईसिडकोकडून नवी मुंबईत १५ हजार घरांची लॉटरी

सिडकोकडून नवी मुंबईत १५ हजार घरांची लॉटरी

Subscribe

नव्या घरांच्या प्रतिक्षेत असलेल्या मुंबईकरांना खुशखबर आहे. कारण सिडकोकडून नवी मुंबईत १५ हजार घरांची लॉटरी निघाली आहे. त्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी ही घरं आहेत. १५ ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी या अर्ज नोंदणीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

घरांचं स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी तसंच स्वतातील घरांच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सिडकोकडून नवी मुंबईत१५ हजार घरांसाठी लॉटरी निघणार आहे. १५ ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी या अर्ज नोंदणीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

१५ ऑगस्टपासून अर्ज नोंदणी

मुंबईतील म्हाडाच्या लॉटरीनंतर आता सिडकोने देखील स्वत घराची लॉटरी काढली आहे. त्यामुळे घर खरेदीसाठी सर्वांना सुवर्ण संधी असणार आहे. अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी ही घरं आहेत. विशेष म्हणजे या घरांसाठी म्हाडाच्या धर्तीवर ऑनलाईन अर्ज मागवले जाणार आहेत. १५ ऑगस्टपासून या प्रक्रियेला सुरुवात करण्याची सिडकोची तयारी आहे.

- Advertisement -

याठिकाणी असणार सिडकोची नवी घरं

सर्वसामान्य ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन सिडकोने विविध आर्थिक गटांसाठी पुढील वर्षभरात नवी मुंबई क्षेत्रात ५५ हजार घरं बांधण्याचा निर्धार केला आहे. त्यापैकी १४ हजार ८२० घरांचं बांधकाम प्रगतिपथावर आहे. ही घरं कळंबोली, खारघर, तळोजा, द्रोणागिरी आणि घणसोली या पाच नोडमध्ये उभारली जात आहेत. यात एकूण ११ गृहप्रकल्पांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -