घरमुंबईविधानपरिषदेच्या पाच नवनिर्वाचित सदस्यांना शपथ

विधानपरिषदेच्या पाच नवनिर्वाचित सदस्यांना शपथ

Subscribe

विधानपरिषदेच्या औरंगाबाद, नागपूर, पुणे विभाग पदवीधर आणि पुणे, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर निर्वाचित झालेल्या पाच नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी मंगळवारी विधानभवनात झाला. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी पाच नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली.

औरंगाबाद पदवीधरचे सतीश चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस), नागपूर पदवीधरचे अभिजित वंजारी (काँग्रेस), पुणे पदवीधरचे अरुण लाड (राष्ट्रवादी काँग्रेस), पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे जयंत आसगांवकर (काँग्रेस) आणि अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे किरण सरनाईक (अपक्ष) यांनी आज आपल्या पदाची शपथ घेतली.

- Advertisement -

विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित या शपथविधी कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मंत्रिमंडळातील विविध विभागांचे मंत्री आणि राज्यमंत्री उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -