घरमुंबई'मुंबईत कोरोनाबाधितांवरील उपचारात शासनाचे योगदान काय?'

‘मुंबईत कोरोनाबाधितांवरील उपचारात शासनाचे योगदान काय?’

Subscribe

शासनाकडून उपलब्ध झालेल्या बेडची संख्या जाहीर करण्याची नितेश राणेंची मागणी

मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात खाटाच उपलब्ध नाहीत. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जात असले तरी यामध्ये शासनाचे योगदान काय असा सवाल आमदार नितेश राणे यांनी केले. त्यामुळे मुंबईतील रुग्णालयांमध्ये शासनाने उपलब्ध करून दिलेल्या बेडची संख्या किती आहे हे जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मुंबईतील शीव येथील लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर जिथे उपचार केले जातात, तिथेच खाटांवर मृतदेह ठेवण्यात आले असल्याची चित्रफित भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रसारीत केल्यानंतर समाज माध्यमातून एकच गोंधळ उडाला आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली. या घटनेवरून महापालिकेच्या रुग्णालयातील गलथानपणा उघडकीस आल्याने सर्वच यंत्रणा कामाला लागली. त्यामुळे याची चौकशी करण्यात येत आहे.

- Advertisement -

आमदार नितेश राणे यांनी महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांना पत्र लिहून महापालिकेतील किती आणि कोणत्या रुग्णालयात कोरोना महामारीवर उपचार करण्यासाठी किती खाटांची व्यवस्था केली आहे, हे नागरिकांना कळणे अत्यंत आवश्यक आहे. तरी महापालिकेत असलेल्या कोणकोणत्या रुग्णालयात रुग्णालयात कोरोना महामारीवर उपचार करण्यासाठी शासनाकडून उपलब्ध केलेल्या व्यवस्थेची व खाटांची माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

राज्यासह मुंबईत अतिवेगाने महामारीचा पसार होत आहे. त्यामुळे सध्या मुंबईमध्ये हजारो रुग्ण कोरोनाबाधित होत आहेत. यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता, तेथे त्यांची व्यवस्था तसेच खाटा उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ही महामारी आटोक्यात आणणे कठीण जात आहे. परिणामी नागरिकांमध्ये संभ्रमाचे आणि संतापाचे वातावरण पसरल्याचे पाहावयास मिळत असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे.


महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह कोरोना समन्वयकांना रस्त्यांवर उतरवले!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -