घरमुंबईमनपाच्या नोटीस क्लार्कला लाच घेताना अटक

मनपाच्या नोटीस क्लार्कला लाच घेताना अटक

Subscribe

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आनंद सीताराम भोईर यांच्यासह त्यांच्या चालकाला 22 लाख रुपयांची लाच घेताना मंगळवारी अटक झाली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सलग दुसर्‍या दिवशी धडक कारवाई करताना महानगरपालिकेच्या एका नोटीस क्लार्कला सहा हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. धनश्याम सोपान घोरपडे असे या नोटीस क्लार्कचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत पोलिसांनी सहा हजार रुपयांची कॅश जप्त केली आहे.

या कारवाईमुळे मालाडच्या मनपा कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. यातील तक्रारदार व्यापारी असून त्यांचा बांगडी बनविण्याचा कारखाना आहे. त्यांच्याविरुद्ध विलेपार्ले येथील स्थानिक न्यायालयात एक केस दाखल झाली होती. याच प्रकरणात त्यांनी धनश्याम घोरपडे यांची भेट घेतली होती. घोरपडे हे महानगरपालिकेच्या मालाड येथील लिबर्टी गार्डन, पी नॉर्थ वॉर्डमध्ये नोटीस क्लार्क म्हणून कार्यरत आहे. या प्रकरणात त्यांना मदत करण्याची तयारी दर्शवून धनश्याम घोरपडे यांनी त्यांच्याकडे सहा हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या अधिकार्‍यांनी बुधवारी संबंधित कार्यालयात साध्या वेशात सापळा लावला होता.

- Advertisement -

तक्रारदार सहा हजार रुपये घेऊन गेल्यानंतर घोरपडे यांनी तीन हजार रुपये घेतले आणि उर्वरित तीन हजार रुपये त्यांना परत केले. ही लाच घेताना या अधिकार्‍यांनी घोरपडे यांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी सहा हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. 1 जानेवारीला आनंद भोईर या पोलीस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. ही कारवाई ताजी असताना 2 जानेवारीला घनश्याम घोरपडे या क्लार्कला पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -