दुधाद्वारे वाढवा सौंदर्य

milk
प्रातिनिधिक फोटो

दुधाला पूर्णब्रह्म म्हणतात. असे हे अतिशय आरोग्यदायी असलेले दूध त्वचेचे सौंदर्य वाढवण्याचे देखील काम करते. कसे ते जाणून घेऊया पुढीलप्रमाणे.

*दूध गुलाब जलात मिसळून नियमित चेहर्‍याला लावल्याने त्वचेचा रंग उजळतो.

*दुधामध्ये थोडे मीठ मिसळून सकाळ-संध्याकाळ चेहर्‍याला लावल्याने मुरुमे नाहीशी होतात.

*बदाम पेस्ट, बेसन पीठ आणि गाजराचा रस मिसळून त्याचे उटणे बनवल्याने त्वचेचा पोत सुधारतो.

*दूध नियमित संपूर्ण शरीराला चोळून लावल्याने त्वचा चमकदार होते.

*नखांना नियमित दुधाने मालिश केल्यास नखे सुंदर आणि चमकदार होतात.

*दुधात लिंबाचा रस मिसळून हातावर चोळल्याने हातांची त्वचा सुंदर होते.

*ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी दररोज ओठांना दूध लावा किंवा दुधाच्या साईने मालिश करा.

*चारोळी दुधात मिसळून त्वचेवर लावल्याने त्वचा चमकदार होते.