घरमुंबईचोर सोडून संन्यासाला शिक्षा

चोर सोडून संन्यासाला शिक्षा

Subscribe

गुन्हेगार सोडून सामाजिक कार्यकर्त्यांना 149 कलमान्वये नोटिसा

निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी समाजकंटक किंवा गुन्हेगारांना बजावण्यात येणार्‍या नोटिसा वसई तालुक्यातील साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना बजावण्याचा पराक्रम पालघर पोलिसांनी केला आहे.पालघर लोकसभा निवडणुकीचे वातावरण हळुहळू तापू लागले असतानाच त्यावर वॉच ठेवून निवडणुका शांततेत पार पाडण्याची भूमिका पोलिसांनी घेण्याऐवजी आगीत तेल ओतण्याचा प्रकार केला आहे. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गुंड, समाजकंटक किंवा गुन्हेगारांना 149 कलमान्वये नोटिसा देऊन ताकीद दिली जाते. कित्येक गुंडांना तडीपारही केले जाते. असे असताना,पालघर पोलिसांनी गुन्हेगार सोडून वसई तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यीकांनाच 149 च्या नोटिसा बजावून त्यांना गुंड ठरवले आहे.

या कार्यकर्ते साहित्यीकांना नोटिसा
हरित वसई संरक्षण समितीच्या चळवळीसाठी देशभरात ओळखले जाणारे मार्कुस डाबरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तथा कॅथलिक बँकेच्या माजी अध्यक्षा डॉमणिका डाबरे, माजी आमदार डॉमणिक घोन्सालवीस, सुप्रसिद्ध साहित्यिक कवी सायमन मार्टीन यांच्यासह वसईतील अनेक जणांना या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तुम्ही वा तुमच्या हस्तकांकरवी शांततेचा भंग केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही वसईचे पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे यांनी दिलेल्या नोटिसीत दिला आहे, तर त्यामुळे वसईकर संतप्त झाले आहेत. त्यांनी या नोटिसांच्या निषेधार्थ पोलीस ठाण्यावर धरणे धरण्याचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी घुमजाव केले आहे.

- Advertisement -

सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिकांना देण्यात आलेल्या नोटिसा नजरचुकीने बजावण्यात आल्या आहेत. असे सांगून त्या मागे घेण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांनी स्पष्ट केले आहे, तर या नोटिसांची चौकशी करण्यात येईल, असे वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -