घरमुंबईचर्चगेट स्टेशनवर होर्डिंग कोसळून वृद्धाचा मृत्यू

चर्चगेट स्टेशनवर होर्डिंग कोसळून वृद्धाचा मृत्यू

Subscribe

चर्चगेट स्टेशन परिसरात होर्डिंग कोसळून एका वृद्धाचा मृत्यू झाला असून तीन प्रवासी जखमी झाल्याची धक्कादायक घटना आज घडल्याचे समोर आले आहे.

चर्चगेट स्टेशन परिसरात होर्डिंग कोसळून एका वृद्धाचा मृत्यू झाला असून तीन प्रवासी जखमी झाल्याची धक्कादायक घटना आज, बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. मधुकर नार्वेकर (६२) असे या वृद्धाचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच संबंधित होर्डिंग हे पश्चिम रेल्वेअंतर्गत येत असल्याची माहिती समोर आली आहे. जोरदार वाऱ्यामुळे हे होर्डिंग कोसळून यामध्ये मधुकर नार्वेकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र, होर्डिंग कोसळण्यामागील नेमके कारण काय? हे अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -