घरताज्या घडामोडीवनप्लस देणार डोअरस्टेप सुविधा

वनप्लस देणार डोअरस्टेप सुविधा

Subscribe

वनप्लस या जागतिक तंत्रज्ञान ब्रँडने आज अधिकृतरित्या त्यांच्या अभूतपूर्व डोअरस्टेप रिपेअर सेवेची सुरूवात केली. आता वन प्लसकडून ग्राहकांच्या दारापर्यंत दुरुस्ती सेवा देण्यात येणार आहे. केली. आपल्या ग्राहकांना प्रीमिअम सेवा देण्यासाठी ही नवी सेवा सुरू करण्यात आली आहे. निव्वळ उत्पादनांच्या पलिकडे जात प्रीमिअम अनुभव देण्याच्या ब्रँडच्या सक्रिय प्रयत्नांचा भाग म्हणून ही नवी, नावीन्यपूर्ण सेवा सुरू करण्यात आली आहे.

स्मार्टफोन क्षेत्रातील बहुंताश कंपन्या आजही पारंपरिक सर्विस सेंटर्सचा पर्याय स्वीकरतात. तर, बाजारपेठेतील या आघाडीच्या, नेतृत्वस्थानी असलेल्या प्रीमिअम स्मार्टफोन ब्रँडने मात्र हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सेवा अशा दोन्ही प्रकारांसाठी ग्राहकांच्या घरी जाऊन सेवा देण्याचा पर्याय स्वीकारला आहे. अशी सेवा देणारा हा आजघडीचा जगातील एकमेव ब्रँड आहे असा कंपनीचा दावा आहे. मागील सहा महिने प्रायोगिक पातळीवर हा उपक्रम राबवल्यानंतर आता बंगळुरु, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई आणि पुणे शहरात ही सेवा सुरू केली गेली. येत्या काळात सर्व प्रथम श्रेणी आणि काही द्वितीय श्रेणी शहरांमध्ये ही सेवा सुरू केली जाणार आहे. या नव्या सेवेमुळे या ब्रँडने स्वत:ला वापरकर्त्यांसाठी अधिक सोयीचा ब्रँड बनवले आहे. सेवेसंदर्भातील कोणताही प्रश्न सोडवण्यासाठी ही सेवा देऊ करत सर्व प्रकारच्या सेवेत या ब्रँडने तब्बल ९६ टक्के असा ग्राहक समाधान टप्पा गाठला आहे.

- Advertisement -

या नव्या, ग्राहकांच्या दारापर्यंत सेवा पोहोचवण्याच्या उपक्रमामुळे पोस्ट सेलिंग सेवेसह सर्व विभागांमध्ये प्रीमिअम आणि सुविधा असलेला अनुभव देता यावा असा आमचा प्रयत्न आहे असे वनप्लस इंडियाचे महाव्यवस्थापक विकास अग्रवाल म्हणाले. वापरकर्त्याला उत्पादनाचे प्रीमिअम मूल्य आणि उत्कृष्ट अनुभव घेता यावा, असा आमचा आग्रह आहे. याच धर्तीवर आमच्या समुदायाला ही नवी, दारापर्यंत पोहोचलेली सेवा अत्यंत लाभदायक ठरेल, असा आमचा विश्वास आहे.”

अशी मिळवा डोअरस्टेप सेवा

ग्राहकांना या सेवेसाठी वनप्लस केअर अॅपचा वापर करता येईल. हे अॅप गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे. त्यांच्या सोयीने इंजिनीअरने कधी भेट द्यावी, यासाठीची वेळ ग्राहकांना निवडता येईल. या सेवेतील आणखी एक भाग म्हणजे वनप्लसतर्फे वनप्लसच्या ग्राहकांना कोणतीही समस्या असल्यास त्यांचा फोन घेऊन जाण्याची आणि तो परत आणून देण्याची विनामूल्य सेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारतातील ८० टक्के भाग या सेवेत समाविष्ट करत ८००० हून अधिक पिन कोड क्रमांकावर ही सेवा उपलब्ध आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -