घरमुंबईपरीक्षेसाठी शिक्षकांची ऑनलाईन उपस्थितीही योग्य - सरकारची माघार

परीक्षेसाठी शिक्षकांची ऑनलाईन उपस्थितीही योग्य – सरकारची माघार

Subscribe

शिक्षक संघटनांकडून झालेल्या विरोधामुळे सरकारने माघार घेत शिक्षकांना आवश्यकतेनुसार ऑनलाईन व प्रत्यक्ष उपस्थिती राहण्याची मुभा दिली आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षा व परीक्षेच्या कामकाजाशी संबंधित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची १०० टक्के उपस्थिती सरकारने बंधनकारक केली होती. मात्र यावर शिक्षक संघटनांकडून झालेल्या विरोधामुळे सरकारने माघार घेत शिक्षकांना आवश्यकतेनुसार ऑनलाईन व प्रत्यक्ष उपस्थिती राहण्याची मुभा दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कॉलेजमध्ये उपस्थित राहण्याबाबत शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

letter

- Advertisement -

अंतिम वर्षाची परीक्षेची तयारी आणि निकाल वेळेत लावण्यासाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना कॉलेजामध्ये १०० टक्के हजेरी लावण्याचे आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांची सुरक्षा लक्षात घेत प्राध्यापक संघटनांनी शिक्षकांच्या १०० टक्के उपस्थितीला विरोध दर्शवला आहे. शिक्षकांनी केलेल्या या विरोधाची दखल घेत उपस्थितीबाबत सरकारने स्पष्टीकरण सादर केले आहे. यामध्ये परीक्षा व परीक्षेच्या कामकाजाशी संबंधित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची उपस्थिती आवश्यक असली तरी आवश्यकतेनुसार ही उपस्थिती प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन असणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. परीक्षा किंवा परीक्षेशी संबंधित कामकाजाचा खोळंबा होऊ नये म्हणून विद्यापीठ किंवा कॉलेजांनी उपस्थितीसंदर्भात आपल्या स्तरावर गरजेनुसार निर्णय घ्यावा, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने विद्यापीठ व कॉलेजांना केल्या आहेत. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये सुरू होणार्‍या अंतिम सत्राच्या परीक्षेवेळी शिक्षकांना ऑनलाईनही उपस्थित राहण्याची मुभा मिळाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन मुभा मिळाल्याने शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -