घरमुंबईदोन कोटी बांधलेली घरं गेली कुठं? - विजय वडेट्टीवार

दोन कोटी बांधलेली घरं गेली कुठं? – विजय वडेट्टीवार

Subscribe

विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

‘मुख्यमंत्री म्हणतात युती सरकारने दोन कोटी घरे बांधली मग ती बांधलेली घरे गेली कुठे?’ असा खडा सवाल करत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ‘हे सरकार थापाडे असून केवळ आकडेफेक करून वेळ मारून नेण्याचा धंदा करीत आहे’, अशा शब्दांत युती सरकारचे वाभाडे काढले. आज सकाळी बी १ या शासकीय निवासस्थानी ते पत्रकारांसोबत बोलत होते. ‘जवुळका रेल्वे येथील सुरेश अवचार यांना घरकुल योजनेतून घर मंजूर झाले होते. ते मिळावे म्हणून एका वर्षापासून ते पंचायत समितीमध्ये खेपा घालून अर्ज विनंत्या करीत होते. मात्र संबंधित अधिकारी थातूर मातूर कारणे सांगून त्यांचे काम टाळत होते. येरझाऱ्या घालून हताश झालेल्या अवचार यांनी अखेर तहसीलदारांना रितसर लेखी पत्र देऊन स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करणार असल्याचे कळवले होते. आज त्यांनी खरोखरच अंगावर पेट्रोल ओतून घेतले. प्रकरण इतके गंभीर असतानाही सरकार आणि अधिकारी अवचार यांच्या मरणाची वाट पहात होते आणि त्यानंतर अश्रू ढाळणार होते का?’ असा सवालही त्यांनी केला.


हेही वाचा – चंद्रकांत पाटील निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत का? विजय वडेट्टीवार

घरं फक्त कागदावरच बांधली?

‘या सरकारला थोडीशी जरी चाड असेल तर मंजूर घरकुल असलेल्या अवचार यांना तातडीन घर बांधून द्यावे आणि त्यांची गांजवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी’, अशी मागणी वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली. ‘सरकार म्हणते आम्ही प्रत्येकाला घर देणार, कधी सरकार म्हणते आम्ही पन्नास लाख घरे बांधली, कधी म्हणते एक कोटी, दोन कोटी, मग ही दोन दोन कोटी घरे बांधली तरी कुठे आणि गेली तरी कुठे? की केवळ कागदावरच घरे बांधली? असा सवाल वडेट्टीवार यांनी यावेळी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -