घरमहाराष्ट्रशिवसेनेचे राष्ट्रवादीला खिंडार; ठाण्यात पुन्हा फोडाफोडीचे राजकारण

शिवसेनेचे राष्ट्रवादीला खिंडार; ठाण्यात पुन्हा फोडाफोडीचे राजकारण

Subscribe

ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीला शिवसेनेचे खिंडार. पालकमंत्री एकनाथ शिंदेने केली फोडाफोडीच्या राजकारणाची परतफेड

राष्ट्रवादीचे शहापूर मधील आमदार पांडुरंग बरोरा यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्तिच केले आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेऊन पांडुरंग बरोरा यांनी आपला राजीनामा दिला. २०१२ साली ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीत फोडाफोडीचे राजकारण रंगले होते. शिवसेनेने आमदार सुभाष भोईर आणि काही नगरसेवकांना पक्षात प्रवेश दिला होता. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी खासदार आनंद परांजपे यांनाच सेनेतून फोडून राष्ट्रवादीत प्रवेश दिला होता. त्या घटनेची पुनरावृत्ती पुन्हा एकदा ठाण्यात होताना दिसत आहे.

पांडुरंग बरोरा हे पवार कुटुंबियांच्या जवळेचे मानले जात होते. राष्ट्रवादीचे नवे पॉवर सेंटर असलेल्या अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांचे नाव नेहमीच घेतले जात होते. मात्र शहापूरमधील गटबाजी आणि निवडून येण्याची खात्री या कारणांमुळे बरोरा यांनी पक्षांतर करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. उद्या मातोश्रीवर जाऊन बरोरा हाती शिवबंधन बांधून घेतील. आमदार बरोरा यांनी जवळच्या कार्यकर्त्यांची मीटिंग घेऊन त्यांना आपला निर्णय कळवलेला आहे. यापैकी किती कार्यकर्ते त्यांच्यासोबत जातात? हे देखील उद्या कळेल.

- Advertisement -

हे वाचा – अजित पवारांचे विश्वासू; शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा शिवसेनेत प्रवेश करणार

पालघर, ठाणे पट्ट्यात शिवसेनेचे वर्चस्व

लोकसभा निवडणुकीत शिवेसेनेने पालघर मतदारसंघ भाजपकडून मागून घेतला. त्यासाठी राजेंद्र गावित यांना भाजपमधून आयात करत सेनेत प्रवेश देण्यात आला होता. त्यानंतर आता शहापूर या आदिवासी मतदारसंघात देखील शिवसेनेने विद्यमान आमदाराला आपल्या पक्षात खेचण्यात यश मिळवले आहे. याआधी ठाण्यातील मुरबाडचे आमदार किसन कथोरे, अपक्ष आमदार गणेश गायकवाड, नवी मुंबईतील आ. मंदा म्हात्रे यांना भाजपने आपल्याकडे वळवले आहे. तसेच ठाण्यातील दिवंगत वसंत डावखरे यांचे सुपुत्र निरंजन डावखरे यांना देखील भाजपने प्रवेश दिलेला आहे. त्यामुळे ठाण्यात आता जितेंद्र आव्हाड आणि नवी मुंबईत नाईक परिवार एवढेच नेतृत्व राष्ट्रवादीकडे उरले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -