घरमुंबईअवयवदानासाठी मराठवाड्यात पदयात्रेचे आयोजन

अवयवदानासाठी मराठवाड्यात पदयात्रेचे आयोजन

Subscribe

अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी 'दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन' या संस्थेमार्फत मराठवाड्यात अवयवदान पदयात्रा काढली जाणार आहे. या पदयात्रेत मुंबईतील अवयवदान प्रचारक सहभागी होणार आहेत.

अवयवदानाची जनजागृती मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मुंबईसह खेड्यापाड्यातील लोकांपर्यंत अवयवदानाचं महत्त्व पोहोचवावं यासाठी ‘दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन’ या संस्थेमार्फत मराठवाड्यात अवयवदान पदयात्रा काढली जाणार आहे. या पदयात्रेत मुंबईतील अवयवदान प्रचारक सहभागी होणार आहेत. १२ नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०१८ या काळात औरंगाबाद ते मराठवाडा अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, तुळजापूर असा या पदयात्रेचा मार्ग असल्याचे दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अॅन्ड बॉडी डोनेशनचे सदस्य संदीप देशपांडे यांनी सांगितले.

पदयात्रेचा एकूण प्रवास ६७१ किमीचा आहे. पदयात्रा ३८ ठिकाणी थांबणार आहे. मुख्य उद्दिष्ट फक्त एकच आहे ते म्हणजे खेड्यापाड्यातील लोकांनी ही अवयवदानासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आतापर्यंत अनेक पदयात्रा किंवा जनजागृतीपर कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा १२ ते १९ डिसेंबर दरम्यान पदयात्रा काढली जाणार आहे.
– संदीप देशपांडे, सदस्य, दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अॅन्ड बॉडी डोनेशन

- Advertisement -

इतर शहरांमध्येही पदयात्रा केली 

पदयात्रेदरम्यान ज्या ज्या ठिकाणी सहज शक्य होईल अशा चावडीवर, रोटरी क्लब, लायन्स क्लब किंवा शाळा कॉलेजांमधून अवयवदानाचे प्रबोधन केले जाते. याआधी नाशिकमध्ये ही पदयात्रा काढण्यात आली होती. तर, नेवारी महिन्यात मुंबईहून गोव्याला पदयात्रा काढून अवयवदानाबाबत माहिती दिली गेली होती.

भारतात अवयवदानाबाबात जनजागृतीची गरज 

भारतात एक दशलक्ष लोकांच्या मागे केवळ ०.८ टक्केच अवयवदान होतं. अवयवदानाचं महत्त्व घराघरात पोहोचवावं यासाठी दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अॅन्ड बॉडी डोनेशन ही संस्था गेल्या कित्येक वर्षांपासून काम करत आहे. १२ नोव्हेंबरला सुरु करण्यात येणाऱ्या या पदयात्रेमध्ये मराठवाड्यातील प्रत्येक गावागावात जाऊन अवयवदानाबाबत लोकांना प्रोत्साहन करण्यात येणार आहे. देशपांडे पुढे म्हणाले, “या पदयात्रेत मुंबईतील अवयवदानासाठी काम करणारे १० कार्यकर्ते सहभागी होतील. यात श्रीकांत आपटे, पुरूषोत्तम पवार, प्रियदर्शन बापट, दत्ता कुलकर्णी, शैलेश देशपांडे, चंद्रशेखर देशपांडे, नागपूरचे शरद दाऊतखानी इत्यादी जणांचा समावेश असेल. ठिकठिकाणी अवयवदान व देहदान या संदर्भात जनजागृतीसाठी सभा घेण्यात येतील. शाळा, कॉलेज, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा ठिकाणीही व्याख्यानं आणि सभा घेऊन अवयवदानाचं महत्त्व पटवून देण्यात येईल.”

पदयात्रेतील ठळक मुद्दे

  • मराठवाड्यात अवयवदानाची पदयात्रेला १२ नोव्हेंबरला सुरूवात
  • औरंगाबाद ते तुळजापूर ६७१ किमीचा प्रवास करणार
  • या पदयात्रा ३८ ठिकाणी थांबवण्यात येणार
  • प्रत्येक ठिकाणी अवयवदान आणि देहदान या संदर्भात जागृती करण्यासाठी सभा भरवण्यात येईल
  • शाळा, कॉलेज, प्राथमिक आरोग्य केंद्रे अशा ठिकाणीही अवयवदानाचं महत्त्व पटवून देण्यात येईल
  • जाहीर कार्यक्रमातून गावांच्या मुख्य वर्दळीच्या ठिकाणांवर प्रबोधनपर व्याख्याने/सादरीकरणं होतील
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -