घरदेश-विदेश'भारत बंद' नंतरही पेट्रोल-डिझेल दरवाढ सुरुच

‘भारत बंद’ नंतरही पेट्रोल-डिझेल दरवाढ सुरुच

Subscribe

इंधन दरवाढीमुळे जनता त्रस्त झाली असून याविरोधात आज काँग्रेसने भारत बंदची हाक दिली आहे. सलग १६ व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ सुरुच आहे. आज १६ वा दिवस आहे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे जनता आणखी त्रस्त झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये २३ पैशांनी तर डिझेलच्या दरामध्ये २२ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल ८८.१२ रुपये प्रतीलिटर तर डिझेल ७७.३२ रुपये प्रतीलिटर दर झाले आहे. आधीच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेच्या खिशाला आणखी फटका बसत आहे. पेट्रोल-डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दराच्या विरोधामध्ये आज काँग्रेसने भारत बंदची हाक दिली आहे.

- Advertisement -

१६ व्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ

मुंबईमध्ये पेट्रोलच्या किंमतीने ८८ चा आकडा गाठला. तर डिझेलच्या दराने ७७ चा आकडा गाठला आहे. तर राजधानीमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये २३ पैशांनी आणि डिझेलच्या दरामध्ये २२ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोल ८०.७३ रुपये प्रतीलिटर तर डिझेल ७२.८३ रुपये प्रतीलिटर झाला आहे. इंधनाच्या दरामध्ये होणाऱ्या वाढीमुळे जनता हैराण झाली आहे. या दर वाढीमुळे इतर वस्तूंच्या किंमती देखील वाढल्या आहेत.

इंधन दर वाढीविरोधात काँग्रेसचा भारत बंद 

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये सतत होणाऱ्या दर वाढीविरोधात काँग्रेसनं सोमवारी भारत बंदची हाक दिली आहे. काँग्रेसच्या या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, शेकाप यांच्यासह २१ राजकीय पक्षांनी पाठिंबा देत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारला जागे करण्यासाठी आणि महागाईविरोधातील जनतेचा आक्रोश सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी ही बंदची हाक देण्यात आली असल्याचे काँग्रेसने सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -