घरमुंबईडबल डेकर वाहकांची डबल धावाधाव; द्राविड प्राणायामामुळे पाय फ्रॅक्चर

डबल डेकर वाहकांची डबल धावाधाव; द्राविड प्राणायामामुळे पाय फ्रॅक्चर

Subscribe

मुंबईत बेस्टच्या बसेसची एक वेगळी ओळख आहे. त्यात डबल डेकर बस हे बेस्टचे वैशिष्ट्य आहे. पण, या डबलडेकर बसमध्ये तिकीट देताना आधी दोन वाहक होते. पण,आता एकच वाहक असल्याने या वाहकाला द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे. याचा परिणाम म्हणजे या वाहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

मुंबईत बेस्टच्या बसेसची एक वेगळी ओळख आहे. त्यात डबल डेकर बस हे बेस्टचे वैशिष्ट्य आहे. पण, या डबलडेकर बसमध्ये तिकीट देताना आधी दोन वाहक होते. पण, आता एकच वाहक असल्याने या वाहकाला द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे. याचा परिणाम म्हणजे या वाहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याचाच प्रत्यंतर मुंबईतील एका वाहकाला आला. बस कंडक्टर तुडूंब भरलेल्या चालत्या बसमध्ये बॅग, तिकीट बॉक्ससह तिकीट कापण्यासाठी खालीवर ये जा करतात. त्यामुळे, आता तर चक्क एका वाहकाचा पाय फ्रॅक्चर झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे, बेस्टच्या या कारभारावर बेस्ट कामगारांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

बेस्टमध्ये एकूण १२० डबल डेकर बसेसपैकी, फक्त १५ बसेसमध्ये एक वाहक आहे, अशी माहिती बेस्टकडून देण्यात आली आहे. पण, कर्मचार्‍यांच्या म्हणण्यानुसार १५ पेक्षा जास्त बसेसवर एकच वाहक देण्यात आला आहे.
बेस्ट उपक्रमात सध्या १२० या डबल डेकर बसेस आहेत. या बसेसमध्ये एक चालक आणि दोन वाहक असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून बेस्टने पॉईंट टू पॉईंट सेवा सुरू केली आहे. इतकेच नव्हेतर बेस्टने वेट लिस्टच्या बसेस सुद्धा घेतल्या आहेत. त्यामुळे बसेसची संख्या वाढली. मात्र कर्मचार्‍यांची संख्या कमी आहे. मंगळवारी सकाळी मजास आगारातील बस मार्ग क्रमांक ४१५ वर वरिष्ठ बस वाहक सुनील गायकवाड कर्तव्यावर होते. त्यावेळी तिकीट काढताना ते दोन मजल्यांतील चिंचोळ्या जिन्यात अडखळून खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांना जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर मनपा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

- Advertisement -

अनेक वाहकांना शारिरिक त्रास –

वाहकांना तिकीट देताना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते. थोडी देखील चूक झाली तर अपघात होण्याची शक्यता असते. आता तर एकच वाहक असल्याने अनेक बेस्टच्या वाहकांना शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बेस्टने याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया नाव न छापण्याच्या अटीवर बेस्टच्या वाहकांनी दिली आहे.
यासंबंधीत दैनिक ‘आपलं महानगर’ने बेस्टला विचारणा केली असता समाधानकारक उत्तर देण्यात आलेले नाही.

बेस्टच्या चुकीच्या धोरणामुळे बेस्टच्या वाहकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. बेस्ट प्रशासनाने वाहकांच्या जिवाशी खेळणे बंद करून, तात्काळ बेस्टच्या डबल डेकरवर दोन वाहक नियुक्त करावेत. तसेच ज्या वाहकाचा पायाला गंभीर दुखापत झाली आहे त्याला योग्य नुकसान भरपाई द्यावी.

सुनिल गणाचार्य, वरिष्ठ सदस्य,बेस्ट समिती

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -