घरमुंबईचला भुताटकीचे भांडे फोडुयात

चला भुताटकीचे भांडे फोडुयात

Subscribe

गटारी अमावस्येला स्मशानभूमीत पिकनिक !

कुणी भुताचं नाव जरी काढलं तरी मनात भीती दाटून येते, पण या भुताच्या शोधासाठी चक्क अमावस्येच्या रात्री स्मशानभूमीत पिकनिक काढण्यात आली आहे. हे ऐकून तुम्हाला नक्कीच भीती आणि आश्चर्यही वाटलं असेल, पण हे खरं आहे. विद्यार्थी भारती या संघटनेने कल्याण पश्चिमेतील बापगाव नांदकर स्मशानभूमी येथे 31 जुलैच्या रात्री दहा वाजता गटारी अमावस्येला ही पिकनिक आयोजित केली आहे. आता ही अशी पिकनिक का? आणि स्मशानातच का? असा प्रश्नही सहाजिकच पडला असेल. अमावस्येच्या रात्री स्मशानात जाऊन भूत प्रेत काहीही नसते हे सिद्ध करण्यासाठीच ही पिकनिक काढण्यात येणार आहे. अशी माहिती संघटनेच्या राज्य विद्यापीठ अध्यक्षा पूजा मुधाने यांनी दिली.

देशात अंधश्रद्धेने ज्या पद्धतीने थैमान घातले आहे ते फार भयंकर आहे. एखादा भोंदूबाबा एखाद्या सुशिक्षिताला भविष्य सांगण्याच्या नावाखाली लुबाडतो. भोंदूबाबांना हवी तेवढी किंमत मोजायला ही सुशिक्षित मंडळीही सहज तयार होतात. अंधश्रद्धेची छोटी मोठी उदाहरणं आपल्या अवतीभोवती पाहत असतो. मांजर आडवी गेली की काम होत नाही, उंबरठ्यावर शिंकू नये, शनिवारी नखं कापू नये अशा बर्‍याच गोष्टी असतात. जे आपण पाहतो आणि पटत नसूनही काहीच बोलत नाही . त्यामुळे सुरुवात इथून झाली पाहिजे या उद्देशाने हे ओयाजन केल्याचे ठाणे जिल्हाद्यक्ष सर्वेश लवांडे यांनी सांगितले.

- Advertisement -

अमावस्येच्या रात्री स्मशानात जाऊ नये असं आपण ऐकत असतो त्यामुळे अमावस्येच्या रात्रीच स्मशानात जाऊन पूर्ण रात्र तेथे काढली जाणार आहे. तसेच भुतांनी आम्हाला भेटायला यावं यासाठी ‘भुता भुता ये रे आम्ही तुम्हाला भेटायला आलोय रे ’ अशी मुलांनी तयार केलेल्या गाण्यामार्फत भुतांना आव्हान करणार आहोत. असेही सिद्धार्थ कांबळे यांनी सांगितले.

दरवर्षी गटारी अमावस्येला स्मशानभूमीत पिकनिक काढली जाते. यावेळी अनेक विद्यार्थी भीती घेऊन येतात आणि निर्भय होऊन जातात. वेगवेगळ्या खेळांमार्फत अंधश्रद्धेची पोलखोल केली जाते. विद्यार्थ्यांची भीती जावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टास्क दिले जातात. चळवळींच्या गाण्यांची मैफिल भरते. सोबतच जेवणाची मेजवानी असते असे संघटनेच्या मुंबई विद्यापीठ अध्यक्ष आरती गुप्ता यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -