घरमुंबईPMC bank scam : आणखी तीन संचालकांना अटक

PMC bank scam : आणखी तीन संचालकांना अटक

Subscribe

रिझर्व्ह बँकेकडून निर्बंध घालण्यात येण्याची बातमी मिळताच पीएमसी बँकेचे वरिष्ठ अधिकारी व संचालक अशा २३ जणांनी बँकेतून ६५ कोटी रुपये काढले.

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेच्या आणखी तीन संचालकांना अटक करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेकडून निर्बंध घालण्यात येण्याची बातमी मिळताच पीएमसी बँकेचे वरिष्ठ अधिकारी व संचालक अशा २३ जणांनी बँकेतून ६५ कोटी रुपये काढल्याची माहिती न्यायवैज्ञानिक तपासणीच्या अहवालात उघड झाली आहे. त्याचप्रमाणे हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने (एचडीआयएल)ने पीएमसी बँकेच्या संचालकांना ७० कोटी रुपये दिल्याची माहितीसुद्धा समोर आली आहे.

अशी झाली अटक

मंगळवारी सायंकाळी आर्थिक गुन्हे शाखेने पीएमसी बँकेतील ४ हजार ३५५ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी आणखी तीन संचालकांना अटक केली. विशेष तपास पथकाने (एसआयटी)ने त्या तिघांनाही मंगळवारी चौकशीसाठी बोलावले होते. आज बुधवारी त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे. जगदीश मुखे, मुक्ती बावीसी आणि तृप्ती बने अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. जगदीश मुखे हे २००५ पासून बँकेच्या ऑडीट समितीवर देखील होते. मुक्ती बाविसी कर्ज व आगाऊ रक्कम समितीवर २०११ पासून कार्यरत होत्या. तर तृप्ती बने २०१० ते २०१५ या कालावधीत रिकव्हरी समितीच्या सदस्या होत्या. २०१५ ते २०२० या कालावधीसाठी त्यांना कर्ज आणि आगाऊ रक्कम समितीवर नियुक्ती करण्यात आली होती. पीएमसी बँकेने एचडीआयएलला दिलेल्या कर्जाबाबत एसआयटी अधिकाऱ्यांनी त्यांना चौकशीला बोलावले होते. चौकशीत त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्यांना अटक करण्यात आली. या तिघांच्या अटकेनंतर या प्रकरणी आतापर्यंत १२ जणांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पीएमसी बँक घोटाळा : भाजपच्या माजी आमदाराच्या मुलाला पोलीस कोठडी

बँकेतून ६५ कोटी काढले

पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला (ईओडब्ल्यू) न्यायवैज्ञानिक तपासणीचा (फॉरेन्सिक ऑडिट) प्राथमिक अहवाल मिळाला आहे. त्यामध्ये बँकेच्या संचालकांसह २३ कर्मचाऱ्यांनी निर्बंध लागू होण्यापूर्वी ७ ते १९ सप्टेंबर या कालावधीत ६५ कोटी रुपये काढल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर निर्बंध आणून सर्व व्यवहार रोखण्याचे आदेश दिले.

हेही वाचा – PMC Bank Scam: प्रॉपर्टी आणि दुसऱ्या लग्नासाठी जॉय थॉमस झाले जुनैद खान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -