घरमुंबईप्रचाराचा फंडा आता थेट...इंटरनेट

प्रचाराचा फंडा आता थेट…इंटरनेट

Subscribe

सोशल मीडियावरील तरुणांवर राजकीय पक्षांची नजर

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि पक्षांसह उमेदवारांच्या प्रचाराचे वारे वाहू लागले आहेत. मात्र, आचारसंहितेच्या बडग्यामुळे बॅनरबाजी, प्रसिद्धीपत्रकांना लगाम बसला आहे. त्यामुळे यंदा प्रचाराची अधिकाधिक धुरा सोशल मीडियावर आली आहे. मतदानासाठी युवावर्गाला आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाशिवाय पर्याय नसल्याचे राजकीय पक्षांचे मत झाले आहे. त्यामुळे फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप यांना अधिक महत्त्व आहे. मात्र, हे सर्व चालवण्यासाठी उत्तम जाणकार असणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून सोशल मीडिया प्रचार प्रमुखाचा शोध सुरू झाला आहे.

यंदाच्या निवडणुकीत सोशल मीडियावर अधिकाधिक भिस्त आली आहे. राजकीय पक्षांशी संलग्न असलेल्या युवा संघटनेतील तरुण नेते व कार्यकर्ते यांचे पक्षातील महत्त्व यंदाच्या निवडणुकीत प्रचंड वाढले आहे. व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, यू-ट्यूबचा वापर करण्यात हातखंडा असलेल्या युवा वर्गाचे प्रस्थ प्रचंड वाढले आहे. पूर्वीप्रमाणे प्रचारसाहित्य वाटणे, सभांकरिता आवश्यक असलेल्या परवानग्या मिळविणे, बॅनर लावणे ही कामे दुय्यम दर्जाची ठरू लागली आहेत. त्याऐवजी पक्षाला मदत होईल असे विनोद, जिंगल्स, व्हिडिओ, मजकूर तयार करून ते सोशल मीडियावर ‘व्हायरल’ करण्याची जबाबदारी अनेक पक्षांनी आपल्या युवा संघटनांवर सोपवली आहे. त्यामुळे यावेळी युवा वर्ग निवडणुकीच्या कामात अग्रस्थानी आहे. ‘सोशल मीडिया प्रचार प्रमुख’ अशी नवीन संकल्पना उदयास आली आहे. मात्र, यासाठी योग्य तरुणही मिळणे दुरापास्त झाले आहे. लवकरच निवडूक प्रचाराला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सोशल मीडिया सांभाळणारे तसेच आकर्षक कंटेन्ट लिहणार्‍या तरुणांचा शोध राजकीय पक्ष घेत आहेत. कॉलेज तरुण तरुणींना यासाठी आकर्षक मानधन देऊन जोडण्याचा प्रयत्नही सुरू झाला आहे.

- Advertisement -

सुमारे 61 लाख मतदार संख्या असलेल्या ठाणे मतदारसंघात गत वर्षी युवा वर्गाची संख्या वाढली असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. यामध्ये 18 ते 39 वयोगटातील युवांमध्ये 24 लाख 14 हजार 389 मतदार आहेत. हे सर्व सोशल मीडियावर कार्यरत असल्याने राजकीय पक्षांनी या मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर अधिकाधिक करण्यावर भर दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -