घरमुंबईCorona: आयसोलेशन केंद्रातील रुग्ण, डॉक्टरांसह परिचारिकांना निकृष्ट दर्जाचे जेवण

Corona: आयसोलेशन केंद्रातील रुग्ण, डॉक्टरांसह परिचारिकांना निकृष्ट दर्जाचे जेवण

Subscribe

दिल्ली दरबार या हॉटेलमधून जेवण पुरवण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून काही दिवस या हॉटेलमधून येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या जेवणामुळे रुग्ण, कर्मचारी आणि डॉक्टरांकडून संताप व्यक्त

क्वारंटाईन केंद्रामध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याच्या तक्रारीनंतर आयसोलेशन सेंटरमधील रुग्ण, डॉक्टर आणि परिचारिका यांना दिल्ली दरबार या प्रसिद्ध हॉटेलमधून जेवण पुरवण्याचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आला होता, परंतु गेले काही दिवस या हॉटेलमधून येणारे जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रुग्ण, कर्मचारी आणि डॉक्टरांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

निकृष्ट दर्जाच्या जेवणाचा पुरवठा

मुंबईमध्ये सापडणाऱ्या संशयित रुग्णांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था पालिकेने विविध हॉस्पिटलमध्ये केली आहे. त्याचप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष आयसोलेशन सेंटर काही हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आले आहेत. या आयसोलेशन सेंटरमधील रुग्णांसह डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांना मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल दिल्ली दरबारमधून जेवण मागवण्यात येत आहे. सुरुवातीला असलेल्या जेवणाचा उत्तम दर्जा मात्र गेल्या काही दिवसांपासून खालावला आहे. काही वेळेला पुलावच्या नावाखाली फक्त भातच रुग्णांसह सर्वांना देण्यात येत आहे. त्यासोबत डाळ, भाजी किंवा रायता असे कोणतेच पदार्थ देण्यात येत नसल्याने रुग्ण, डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांना नुसताच भात खावा लागत आहे. यामध्ये मधुमेहाच्या रुग्णांनाही नुसताच भात देण्यात येत आहे.

- Advertisement -

पालिकेकडून डॉक्टर, परिचारिकांच्या आरोग्याशी खेळ

कोरोनाशी लढा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांना कोरोनाची लागण होत असल्याची प्रकरणे समोर येत असताना पालिकेने डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांच्या आरोग्याशी खेळ मांडला आहे. आम्हाला उत्तम दर्जाचे जेवण मिळाल्यास आमची रोग प्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होईल, परंतु निकृष्ट दर्जाचे जेवण मिळाल्यास आमचे आरोग्य खालावून रोग प्रतिकारशक्ती कमी होऊन आम्हाला कोरोनाची लागण होण्याची शक्यता असल्याचे डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी सांगितले.


CoronaVirus: १०४ वर्षांच्या वृद्ध महिलेने कोरोनावर केली मात!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -