घरताज्या घडामोडीनाशिक, मालेगावात नवीन दोन रुग्ण पॉझिटिव्ह

नाशिक, मालेगावात नवीन दोन रुग्ण पॉझिटिव्ह

Subscribe

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व पोलीस सर्वोतोपरी खबरदारी घेत असले तरी नाशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हा रुग्णालयास गुरुवारी (दि.16) 93 जणांचे रिपोर्ट मिळाले असून त्यातील दोन रिपोर्ट पॉझिटिव्ह व 91 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह एक रुग्ण नाशिक शहर व दुसरा रुग्ण मालेगावातील आहेत. 26 निगेटिव्ह रिपोर्ट मालेगावातील संशयित रुग्णांचे आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, सामाजिक अंतर ठेवावे, मास्कचा वापर करावा, असे वारंवार आवाहन केले जात आहे. तरीही, नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नाशिककरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

जिल्हा रुग्णालयास गुरुवारी दोन रिपोर्ट पॉझिटिव्ह मिळाले आहेत.  एक पॉझिटिव्ह नाशिक शहरातील ६३ वर्षीय महिलेचा आहे. ती अंबड-सातपूर लिंक रोड परिसरातील आहे. या महिलेचा मुलगा 15 दिवसांपूर्वी पुण्याहून नाशिकला आला आहे. महिलेस निमोनियाची लक्षणे आढळून आल्याने चार दिवसांपूर्वीच जिल्हा रुग्णालयातील कोरोना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. दुसरा रुग्ण 64 वर्षीय पुरुष असून तो मालेगावाचा आहे. या रुग्णास एन्जोप्लास्टीसाठी नाशिकमधील संदर्भ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यास सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या घशाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गुरुवारी दोन रुग्ण पॉझिटिव्ह वाढ झाल्याने आता नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 48 झाली आहे. नागरिकांनी सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने केले आहे.

पॉझिटिव्ह रुग्ण संख्या

- Advertisement -

मालेगाव  40

नाशिक शहर 05

(नाशिक रोड, आनंदवली, गोंविंदनगर, समाजकल्याण विभाग निवारागृह)

नाशिक ग्रामीण 03

(लासलगाव, चांदवड, सिन्नर)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -