घरमुंबईपदविका प्रवेशप्रक्रियेचा मुहूर्त चुकला

पदविका प्रवेशप्रक्रियेचा मुहूर्त चुकला

Subscribe

३ ऑगस्टपासून प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या तंत्रशिक्षण संचलनालयाकडून (डीटीई) सोमवारी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात अपयश आले.

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा यासाठी गतवर्षी दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. मात्र ३ ऑगस्टपासून प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या तंत्रशिक्षण संचलनालयाकडून (डीटीई) सोमवारी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात अपयश आले. त्यामुळे यंदा दहावीचा निकाल जाहीर होऊन आठवडा होत आला तरी प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली नसल्याने विद्यार्थी चिंतेत पडले आहे.

- Advertisement -

दहावीचा निकाल लागल्यानंतर १ ऑगस्टपासून आयटीआय आणि अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. मात्र तंत्रशिक्षण संचलनालयाकडून (डीटीई) राबवण्यात येणारी अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रियेला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. दरवर्षी पदविका अभ्यासक्रमांच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहत असल्याने गतवर्षी डीटीईकडून दहावीच्या निकालापूर्वीच प्रवेश प्रक्रिया सुरू करूनही ५१ हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीचा निकाल उशीरा जाहीर झाल्याने प्रवेश प्रक्रिया वेळेत राबवणे आवश्यक होते. त्यानुसार ३ ऑगस्टपासून अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार होती. परंतु ३ ऑगस्टचा मुहूर्त डीटीईला गाठणे शक्य झाले नाही. त्यामुळे दहावीचा निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला तरीही पदविका अभ्यासक्रमाच्या नोंदणीला सुरुवात झाली नाही. प्रवेश प्रक्रियेच्या नोदणीला होणार्‍या विलंबाचा फटका जागांचे प्रमाण रिक्त राहण्यावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यासंदर्भात तंत्रशिक्षण संचलनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या आठवड्यात प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -