घरमुंबई‘‘प्रभू श्रीरामजी का सन्मान...’’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अयोध्येत झळकले बॅनर

‘‘प्रभू श्रीरामजी का सन्मान…’’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अयोध्येत झळकले बॅनर

Subscribe

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उद्यापासून दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya tour) जाणार आहेत. याआधीही त्यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले असले, तरी मुख्यमंत्रिपदाच्या दृष्टीने ते पहिल्यांदाच अयोध्या दौरा करणार आहेत. मुख्यमत्र्यांसोबत खासदार आणि आमदारही अयोध्या यात्रेत सहभागी होणार आहेत. याशिवाय शिंदेंचे समर्थक आज (7 एप्रिल) ठाणे आणि नाशिकहून अयोध्येला रेल्वेने रवाना होणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (8 एप्रिल) लखनऊ आणि रविवारी (9 एप्रिल) भगवान श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. यानंतर संध्याकाळी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत. एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाण्याआधी लखनऊ आणि अयोध्या रस्त्यावर शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याशी संबंधित पोस्टर्स आणि बॅनर लावण्यात आले आहेत. बॅनर्समध्ये ‘चलो अयोध्या… प्रभू श्रीरामजी का सन्मान, हिंदुत्व का तीर कमान…’ असे लिहिण्यात आले आहे. यासंदर्भात शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत नवा टीझरही आज प्रदर्शित करण्यात आला.

- Advertisement -

13 हजारांहून अधिक शिवसैनिकही जाणार अयोध्येला
एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याची जबाबदारी नाशिकच्या शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी नाशिकहून विशेष गाडी आरक्षित करण्यात आली आहे. 13 हजारांहून अधिक शिवसैनिकही अयोध्येला जाणार असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री शिंदे राम मंदिरात जाऊन महाआरती करणार आहेत. ते सरयू नदीच्या काठीही आरती करतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत पोहोचण्यापूर्वीच अयोध्येत त्यांच्या ‘चलो अयोध्या’चे पोस्टर-बॅनर लावण्यात आले आहेत.

पोस्टर्स आणि बॅनरने वातावरण भगवेमय
अयोध्येतील हनुमान गढी, राम मंदिर परिसरात ठिकठिकाणी एकनाथ शिंदे यांचे स्वागत करणारे पोस्टर्स-बॅनर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्स आणि बॅनर्सवर भगवान श्री राम आणि छत्रपती शिवाजी महाराजांची छायाचित्रे आहेत. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धरमवीर आनंद दिघे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे फोटो आहेत. या सर्वासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा फोटो जोडण्यात आला आहे. पोस्टरमध्ये शिवसेनेचा झेंडा आणि धनुष्यबाणाचे चिन्हही आहे. या सर्व गोष्टीमुळे अयोध्येतील वातावरण भगवामय झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -