घरमुंबई'पप्पू पुन्हा नापास झाला'; मनसेने उडवली राम कदमांची खिल्ली

‘पप्पू पुन्हा नापास झाला’; मनसेने उडवली राम कदमांची खिल्ली

Subscribe

निवडणुकीच्या तोंडावर राम कदम यांनी मनसेला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे मनसेसैनिक राम कदम यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही.

मनसे आणि शिवसेना या दोन पक्षांत बॅनरबाजीवरून रंगलेले राजकारण आपण अनेकदा बघितले असेल. मात्र आपल्याच पक्षाच्या माजी नेत्याला त्याच्या कामगिरीबद्दल आगळ्यावेगळ्या शुभेच्छा देऊन खिल्ली उडवण्याचा प्रकार घाटकोपर येथे घडला आहे. भाजपचे आमदार राम कदम यांना “गोविंदा आला रे आला, पप्पू पुन्हा नापास झाला”, असे म्हणत मनसेने कदम यांची खिल्ली उडवली आहे. प्रजा फाऊंडेशनने नुकताच प्रसिध्द केलेल्या आमदार कामगिरी अहवालात आमदार राम कदम यांचा शेवटचा ३२ वा क्रमांक मिळाला असल्यामूळे घाटकोपर मधील चौका चौकात मनसेने खिल्ली उडवण्यासाठी बॅनर लावले आहेत. राम कदम हे २००९ साली मनसेच्या तिकिटावर निवडूण आले होते. मात्र २०१४ निवडणुकीत राजकीय वाऱ्याची दिशा ओळखून राम कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे राम कदम यांच्यावर टीका करण्याची एकही संधी मनसेचे कार्यकर्ते सोडत नाहीत. मनसेचे घाटकोपर विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी हे बॅनर लावलेले आहेत.

का लावले मनसेने बॅनर

“पप्पू कान्ट डान्स साला, गोविंदा आला रे आला, पप्पू पुन्हा नापास झाला” अशी हेडिंग बॅनरवर दिली आहे. जगातल्या सर्वात मोठ्या नकली भंपक गोष्टी करणारे, नको ती स्वयम घोषित विशेषण लावणारे घाटकोपरचे आ. राम कदम यांना प्रजा फाऊंडेशनने केलेल्या सर्वेक्षणात पुन्हा एकदा शेवटून प्रथम क्रमांक पटकावला याबद्दल त्यांचे अभिनंदन!!! असा संदेश बॅनरवर छापलेला आहे. तसेच प्रजा फाऊंडेशनने केलेल्या प्रामाणिक आणि खऱ्या सर्वेक्षणाबद्दल फाऊंडेशनचेही अभिनंदन व्यक्त करण्यात आले आहेत.

- Advertisement -

घाटकोपर मधील भाजप आमदार राम कदम यांची मनसेने पोस्टरबाजी करून खिल्ली उडवली आहे. तसेच त्यावर अभिनंदन देखील केले आहे .राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवाचाहि त्यात उल्लेख केला असून सदर प्रभागात कोणतीही विकास कामे होत नसल्यामुळे अहवालात शेवटचा क्रमांक मिळाला आहे असे मनसे विभाग अध्यक्ष गणेश चूक्कल यांनी माहिती दिली आहे.

प्रजा फाऊंडेशनचा अहवाल काय सांगतो?

प्रझा फाऊंडेशन ही संस्था विविध महानगरपालिका, आमदार आणि खासदार यांच्या कामगिरीचे सर्वेक्षण करुन वेळोवेळी विविध अहवाल प्रसिद्ध करत असते. २०१६ ते २०१७ या वर्षातील चार अधिवेशनात मुंबईतील आमदारांनी काय कामगिरी केली याबाबत अभ्यास करण्यात आला आहे. या रिपोर्ट कार्डमध्ये काँग्रेसचे आमदार अमिन पटेल प्रथम तर राम कदम सर्वात शेवटी आहेत. शिवसेनेचे सुनिल प्रभू दुसऱ्या क्रमांकावर तर भाजपचे अतुल भातखळकर तिसऱ्या स्थानावर आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -