घरमुंबईसरकार मुस्लिम विरोधी वातावरण तयार करत आहे - प्रकाश आंबेडकर

सरकार मुस्लिम विरोधी वातावरण तयार करत आहे – प्रकाश आंबेडकर

Subscribe

'नागरिकत्व दुरस्ती विधेयक आणून हे सरकार देशात मुस्लिम विरोधी वातवरण करण्याचा प्रयत्न करत', असल्याची टीका वंचित बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

‘नागरिकत्व दुरस्ती विधेयक आणून हे सरकार देशात मुस्लिम विरोधी वातवरण करण्याचा प्रयत्न करत’, असल्याची टीका वंचित बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे. आज लोकसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व दुरस्ती विधेयकाचा प्रस्ताव लोकसभेत मांडल्यानंतर आता या विधेयकाला विरोधकांकडून विरोध होत असताना आता प्रकाश आंबेडकर यांनी यामध्ये उडी घेतली आहे. ‘मुस्लिम ज्याचा धर्म आहे त्याला तुझे नागरिकत्व सिद्ध कर’, असे सांगणारा हा कायदा असल्याचे देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच हा घटनेचा द्रोह असून, इतर मुद्दे बाजूला पडावे म्हणून हिंदू-मुस्लिम वातावरण तयार करण्याची ही भाजप आणि आरएसएसची खेळी असल्याची टीका देखील प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे

या सरकारला नऊ रत्ने विकायची आहेत

विशेष म्हणजे ‘या देशात जी नऊ रत्ने आहेत ती रत्ने विकण्यासाठी हा सरकारचा प्रयत्न असल्याची देखील टीका आंबेडकर यांनी केली. तसेच भाजप आणि आरएसएस स्वतःचा आणि देशासंदर्भातील पर्यायी आराखडा लोकांसमोर न मांडता ते आज भारतीय संविधानाने दिलेला आणि सध्या देश ज्याच्यानुसार वाटचाल करतो आहे तो अस्तित्वात असलेला संविधानाचा ढाचा उध्वस्त करायचा प्रयत्न करत असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. आज देशापुढे गंभीर आर्थिक समस्या आणि बेरोजगारीच्या समस्या आहेत त्यातून मार्ग काढण्यात सरकार अपयशी ठरत आहे, अशावेळी लोकांच्या आर्थिक प्रश्नावरून लक्ष विचलीत करण्यासाठी देशांमध्ये मुस्लिम विरुद्ध इतर, असे ध्रुवीकरण करून धार्मिक झगडे लावण्याचा सरकारचा इरादा असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – धर्माच्या आधारावर नागरिकत्व देणे अयोग्य – नवाब मलिक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -