घरमुंबईदेशाचा पंतप्रधान लुटारू - प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

देशाचा पंतप्रधान लुटारू – प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लुटारु आहेत, अशी खरमरीत टिका बहुजन वंचित आघाडीचे नेते तथा भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी भिवंडीतील जाहीर सभेत केली आहे.

‘मोदींना नोटा रद्द करण्याचा अधिकार दिला कुणी? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लुटारु आहे’, अशी खरमरीत टिका बहुजन वंचित आघाडीचे नेते तथा भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भिवंडीतील जाहीर सभेत केली आहे. भिवंडी लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. डॉ. अरुण सावंत यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी शहरातील टावरे स्टेडियम येथे वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी अॅड. प्रकाश आंबेडकर बोलत होते. या सभेदरम्यान एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी, एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांच्यासह शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नरेंद्र मोदींना नोटा रद्द करण्याचा अधिकार दिला कोणी

भिवंडीतील पाणी प्रश्न तसेच भिवंडीतील डबघाईला आलेल्या यंत्रमाग व्यवसायाला चालना देण्यासाठी काँग्रेस भाजपच्या खासदारांनी आतापर्यंत काहीच प्रयत्न केले नाहीत, अशी खंत बाळासाहेबांनी यावेळी व्यक्त केली आहे. दरम्यान, अॅड. आंबेडकर यांनी सभेमध्ये उपस्थित असलेल्या नागरिकांना आपल्या खिशातील दहा रुपयांची नोट बाहेर काढण्याचे आवाहन केले. एका युवकाने आपल्या खिशातील दहा रुपयांची नोट काढली. त्यानंतर आंबेडकरांनी या नोटीवरचा मजकूर वाचण्यास सांगितले, नोटीवर असलेला भारताच्या गव्हर्नरांचा संदेश भर सभेत वाचला ‘मै धारक को दस रुपया अदा करने का वचन देता हु’ हा गव्हर्नरांचा संदेश भर सभेत वाचल्यानंतर बाळासाहेबांनी प्रतिप्रश्न केला कि, ‘जर गव्हर्नरांच्या सहीने नोटा चालविल्या जातात, मग नोटा रद्द करण्याचा अधिकार मोदींना दिला कोणी? मोदी डाकू आहेत. देशाचा पंतप्रधान लुटारू आहे’, अशी खरमरीत टीका अॅड आंबेडकरांनी याप्रसंगी करत मोदींच्या नोटबंदीचा चांगलाच समाचार घेतला आहे.

- Advertisement -

यानंतर एआयएमआयएम अध्यक्ष यांनी अभिनेता अक्षय कुमार याने मोदींच्या घेतलेल्या मुलाखतीची खिल्ली देखील उडवली. तसेच सोलापूरच्या सभेत ‘आपण अॅड. बाळासाहेब आंबेडकरांना उचलून काँग्रेसवाल्यांना सांगून दिले की यापुढे आम्ही आमच्या खांद्यावर तुमचा बोजा उचलणार नाही’. यापुढे आपण वंचितांचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकरांना उचलले आहे, असे स्पष्टीकर असदुउद्दीन ओवेसी त्यांनी आपल्या भाषणाप्रसंगी दिले आहे. तर भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरेंबद्दल अपशब्द वापरले मात्र, भाजप अशा व्यक्तींवर कोणतीही कारवाई करत नाही. त्यामुळे अशा देशद्रोही प्रवृत्तीना महाराष्ट्राच्या नागरिकांनी हद्दपार केले पाहिजे, असे आवाहन देखील ओवेसी यांनी यासभेप्रसंगी केले आहे. तर भिवंडीच्या यंत्रमाग व्यवसायासाठी भाजप सरकारने कोणतेही प्रभावी धोरण बनवले नसल्यानेच आज भिवंडीतील यंत्रमाग व्यवसाय डबघाईला आला आहे, अशी प्रतिक्रिया देखील ओवेसी यांनी सभेप्रसंगी व्यक्त केली आहे.


वाचा – धरणामध्ये लघुशंका करणाऱ्यांचे आम्ही गुलाम नाहीत – प्रकाश आंबेडकर

- Advertisement -

वाचा – प्रकाश आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांकडून वृद्धास बेदम मारहाण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -