घरमुंबईविशेष आढावा: ठाण्यात निवडणुकांची पूर्वतयारी जोरात

विशेष आढावा: ठाण्यात निवडणुकांची पूर्वतयारी जोरात

Subscribe

भारत निवडणूक आयोगाने यावेळेस सी व्हिजिल, सुगम, सुविधा, समाधान या मोबाईल एप्लिकेशनचा उपयोग करावा यावर भर दिला आहे.

आगामी लोकसभा निवडणूकींच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बुधवारी (आज) घेतला. ‘जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी सोयी उपलब्ध व्हाव्यात याची खातरजमा करून घ्या. त्याचप्रमाणे एकूणच निवडणूक यंत्रणेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना पुरेसे आणि योग्य प्रशिक्षण मिळावेत याची खबरदारी घ्या’ असे निर्देश नार्वेकर यांनी आज दिले. लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी ६१ हजार ९९४ कर्मचारी यांची सेवा घेण्यात आली असून, २०० व्हिडिओग्राफर्स, ७२ भरारी पथके, ८६७ झोनल अधिकारी व तितकेच उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवणारे अधिकारी असणार आहेत.

मतदान केंद्रांवर सर्व सुविधा

यावेळी राजेश नार्वेकर यांनी मतदान केंद्रांवर दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प, पिण्याचे पाणी, पुरेसे फर्निचर, मदत कक्ष, वीज पुरवठा, प्रसाधनगृहे, नाम फलक, केंद्राकडे जाण्यासाठी रस्ते या सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यासाठी १५१७० बेसिक युनिट्स, ८९६१ सेन्ट्रल युनिट, आणि ७७६१ व्हीव्हीपॅट अशी यंत्रे असून संबंधित कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.

- Advertisement -

आयटी अॅप्लिकेशन्सवर भर

भारत निवडणूक आयोगाने यावेळेस सी व्हिजिल, सुगम, सुविधा, समाधान या मोबाईल एप्लिकेशनचा उपयोग करावा यावर भर दिला आहे. जिल्ह्यातील यंत्रणेने देखील याविषयी व्यवस्थित तांत्रिक दृष्ट्या माहिती घेऊन त्यांचा उपयोग करावा. १९५० ही हेल्पलाईन देखील असून त्याद्वारे मतदार व नागरिकांना व्यवस्थित माहिती मिळावी. योग्य रीतीने प्रशिक्षणाचे नियोजन व्हावे, पुरेसे तंत्रज्ञ्य असावेत अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मतदार ओळखपत्रांचे काम १०० टक्के पूर्ण करावे २ आणि ३ मार्चच्या विशेष मोहिमेत जास्तीत जास्त तरुण तरुणींना मतदार म्हणून नोंदणीसाठी प्रवृत्त करावे असेही त्यांनी सांगितले.

दुसरीकडे मतदानाची टक्केवारी आहे त्याहून अधिक वाढली पाहिजे यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्याच धर्तीवर आमच्याकडून मतदार जागृतीसाठी पुरेपूर प्रयतन केले जातील, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -