घरमुंबई२६ फेब्रुवारीला होणार बीएमसी एसबीआय अर्ध मॅरेथॉनसाठी "प्रोमो-रन"

२६ फेब्रुवारीला होणार बीएमसी एसबीआय अर्ध मॅरेथॉनसाठी “प्रोमो-रन”

Subscribe

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मैं फिट तो इंडिया फिट’ या घोषणेसह ‘फिट इंडिया’ या अभियानाची सुरुवात केली. याच अभियानातून प्रेरणा घेऊन मुंबई महापालिकेने ‘फिट मुंबई बीएमसी एसबीआय हाफ मॅरेथॉन’चे आयोजन केले आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मैं फिट तो इंडिया फिट’ या घोषणेसह ‘फिट इंडिया’ या अभियानाची सुरुवात केली. याच अभियानातून प्रेरणा घेऊन मुंबई महापालिकेने ‘फिट मुंबई बीएमसी एसबीआय हाफ मॅरेथॉन’चे आयोजन केले आहे. आपल्या मुंबईला सुदृढतेची म्हणजेच फिटनेसची राजधानी करण्याच्या दृष्टीने ‘फिट मुंबई बीएमसी एसबीआय हाफ मॅरेथॉन’ हे एक महत्त्वाचे आणखी एक पाऊल असल्याचा विश्वास महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी व्यक्त केला. याच मॅरेथॉनच्या पूर्व तयारीचा भाग म्हणून येत्या २६ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘प्रोमो-रन’चे आयोजन करण्यात आले आहे.

या अनुषंगाने आज सोमवारी (ता. २० फेब्रुवारी) पालिका आयुक्त चहल यांच्या अध्यक्षतेखाली एक नियोजन व आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे प्रतिपादन केले. या बैठकीला, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी व अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) निसार तांबोळी, सह आयुक्त चंद्रशेखर चोरे, पोलीस उप आयुक्त (वाहतूक) गौरव सिंग, पोलीस आयुक्त (परिमंडळ १) हरि बालाजी, भारतीय स्टेट बँकेचे उप महाप्रबंधक विमलेन्दु विकास, अर्ध मॅरेथॉनचे समन्वयक तथा सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे, माहिती तंत्रज्ञान खात्याचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे, व्यवसाय विकास विभागाच्या प्रमुख शशी बाला, मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर, प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे यांच्यासह पालिकेचे संबंधित अधिकारी आणि मॅरेथॉन प्रोमो-रनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

- Advertisement -

महापालिकेद्वारे आयोजित करण्यात येणारी अर्ध मॅरेथॉन ही भविष्यात एक आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकीक असलेली मॅरेथॉन ठरेल. त्याचबरोबर मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्गावरील वाहतूक सुरु झाल्यानंतर त्या मार्गावर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी बैठकीदरम्यान नमूद केले. मुंबई महापालिकेद्वारे आयोजित करण्यात येणारी अर्ध मॅरेथॉन ही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मुंबईची एक वेगळी ओळख ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – केवळ शिवसेनाच नव्हे तर ‘या’ पक्षांमध्येही निवडणूक चिन्हावरून होता वाद, जाणून घ्या…

- Advertisement -

दरम्यान, आजच्या बैठकीच्या सुरुवातीला ‘फिट मुंबई बीएमसी एसबीआय हाफ मॅरेथॉन’चे समन्वयक तथा सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी २६ फेब्रुवारी रोजी होणा-या ‘प्रोमो-रन’च्या नियोजनबाबत व करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत संगणकीय सादरीकरणासह सविस्तर माहिती दिली. या अनुषंगाने करण्यात येणा-या वाहतूक व्यवस्था नियोजनाची माहिती उपस्थितांना मुंबई पोलीस दलाच्या प्रतिनिधींद्वारे देण्यात आली. त्याचबरोबर मॅरेथॉन ‘प्रोमो-रन’च्या अनुषंगाने करण्यात येणारी वैद्यकीय व्यवस्था, रुग्णवाहिका व्यवस्था, प्रथमोपचार, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय, साफसफाई याबाबत देखील उपस्थितांना माहिती देण्यात आली.

येत्या रविवारी होणा-या ‘प्रोमो-रन’मध्ये ५ हजार नागरिक भाग घेणार असून याबाबतची नोंदणी प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाली आहे. या ‘प्रोमो-रन’चे आयोजन हे ३ किलो मीटर, ५ किलो मीटर व १० किलो मीटर अशा ३ प्रकारात करण्यात येणार असून याचा शुभारंभ सकाळी ६.०० वा. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाजवळ होणार आहे. याच ‘प्रोमो-रन’च्या अनुभवांचा आधार घेऊन ‘अर्ध मॅरेथॉन’चे आयोजन भविष्यात करण्यात येणार आहे, अशीही माहिती या बैठकीदरम्यान देण्यात आली.

अर्ध मॅरेथॉन उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये
‘फिटनेस दिल से !’ असे या अर्ध मॅरेथॉनचे घोषवाक्य असणार आहे. तसेच निरोगी आणि सुदृढ मुंबईकर हे या मॅरेथॉनचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले आहे. ‘फिट इंडिया’ चळवळीच्या माध्यमातून जनजागृती करुन नियमितपणे न चालणा-यांना चालण्याकरिता उद्युक्त करणे, जे चालण्याचा व्यायाम करतात त्यांना जॉगिंग करण्याकरिता उद्युक्त करणे व जे जॉगिंग करतात त्यांना धावण्यासाठी प्रवृत्त करणे, तसेच टप्प्या-टप्प्याने नागरिकांना केवळ धावणेच नव्हे, तर कोणताही शारीरिक व्यायाम जसे योगा नियमितपणे ३० ते ४० मिनिटे करण्याची सवय लावणे, असे कार्य या माध्यमातून करण्यात येणार आहे, असेही सांगण्यात येत आहे.

फिट मुंबई अर्ध मॅरेथॉन उपक्रमाची व फिट इंडिया चळवळीची ओळख मुंबईकरांना करुन देणे. सद्यःस्थितीत प्रभाग स्तरावर विविध उपक्रमांमार्फत मुंबईकरांना योग, ध्यान, प्राणायाम आदींचे धडे देवून शारीरिक व मानसिक सुदृढतेसाठी प्रशिक्षित केले जात असल्याचे यामागील उद्दिष्ट आहे.

दरम्यान, येत्या २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता मुंबई महापालिका मुख्यालयापासून हुतात्मा स्मारक चौक, चर्चगेट रेल्वे स्थानक, एनसीपीए, मरिन ड्राईव्ह ते आझाद मैदान या मार्गावर ३ किलो मीटर, ५ किलो मीटर आणि १० किलो मीटर अशा ३ प्रकारात ही मॅरेथॉन होणार आहे. ‘प्रोमो-रन’ स्वरुपात होत असलेल्या या मॅरेथॉनची नोंदणी पूर्ण झाली आहे. त्यामध्ये सुमारे ३ हजार महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी आणि ३ हजार नागरिक सहभागी होणार आहेत.

यावर्षीच्या डिसेंबर महिन्यात अथवा पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यातील एका रविवारी ‘फिट मुंबई अर्ध मॅरेथॉन’चे आयोजन करण्याचे प्रस्तावित आहे. ज्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होऊ शकतील. या अर्ध मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी माफक वर्गणी मूल्य असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -