घरमुंबईक्लस्टरच्या माध्यमातून मालकी हक्काचे घर

क्लस्टरच्या माध्यमातून मालकी हक्काचे घर

Subscribe

लोकमान्य नगरमधील रहिवाशांना पालकमंत्र्यांची ग्वाही

लोकमान्य नगरातील रहिवाशांना नागरी समूह पुनर्विकास योजनेंतर्गत मालकी हक्काचे घर मिळवून देण्याची ग्वाही ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देतानाच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी लोकमान्य नगरच्या क्लस्टर योजनेला मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन गुरुवारी एका जाहीर कार्यक्रमात दिले.

लोकमान्य नगर विभागातील चैतीनगर परिसरातील श्री विठ्ठल मंदिराजवळ उभारण्यात आलेल्या एमएलडी जलकुंभाचे लोकार्पण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची पुनर्स्थापना कार्यक्रम ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी लोकमान्य नगरवासीयांना त्यांनी क्लस्टर योजनेत सामावून घेणार असल्याचे सांगितले. यावेळी व्यासपीठावर स्थानिक नगरसेवक व कार्यक्रमाचे आयोजक हणमंत जगदाळे, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते नरेश म्हस्के, ज्येष्ठ नगरसेवक अशोक राऊळ, माजी पालिका विरोधी पक्ष नेते मनोज शिंदे, नगरसेवक प्रकाश बर्डे, नगरसेवक योगेश जानकर, स्थानिक नगरसेविका राधाबाई जाधवर, नगरसेवक दिगंबर ठाकूर, नगसेविका वनिता घोगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -