घरताज्या घडामोडीरेशनकार्डावर धान्य मिळावे; कातकरी कुटुंबाचे अभिनव आंदोलन 

रेशनकार्डावर धान्य मिळावे; कातकरी कुटुंबाचे अभिनव आंदोलन 

Subscribe

रेशन कार्डवर धान्य मिळत नसल्याने गावखेड्यातील आदिवासी कुटुंबियांनी शिधावाटप कार्यालयाबाहेर आंदोलन केले आहे.

शासन कितीही ओरडून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचे बोलत असले तरी आज ही देशाच्या आर्थिक राजधानी पासुन अवघ्या काही किलो मीटर अंतरावरील गावखेड्यातील आदिवासी कुटुंबियांना शिधावाटप यंत्रणेकडून धान्य मिळविण्यासाठी सुध्दा आटापिटा करावा लागत आहे. त्यामुळे आज ही असंख्य आदिवासी कुटुंब शिधावाटप यंत्रणेवरील धान्यापासून वंचित असल्याचे समोर येत आहे. अशाच एका कुटुंबाने आपल्या मुलाबाळांसह भिवंडी तहसीलदार कार्यालय आवारातील पुरवठा अधिकारी यांच्या दालना बाहेर ठिय्या देऊन आपणास धान्य मिळावे यासाठी आंदोलन केले.

तहसीलदार कार्यालयाबाहेर रेशन द्याच्या घोषणा

भिवंडी तालुक्यातील मालबिडी या गावातील दीपक रामू भोये आणि त्यांची पत्नी दीपाली हे दोघे ही कातकरी आदिवासी समाजातील आहेत. त्यांना एकूण सहा मुले असून त्यांच्या अंत्योदय योजनेतील शिधावाटप पत्रिकेवर मागील एक वर्षांपासून धान्य कधी कमी तर कधी मिळाले नसल्याने आपल्या कुटुंबियांच्या पालन पोषणासाठी या अपंग दाम्पत्यांना मोलमजुरीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून राहावे लागते. तर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी श्रमजीवी संघटनेचे तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते तहसीलदार कार्यालयात येत असल्याने दीपाली आणि दीपक भोये यांनी तेथील संघटनेचे पदाधिकारी जयेंद्र गावित यांच्याकडे आपली कैफियत मांडल्यानंतर तात्काळ त्यांनी या कुटुंबास त्यांच्या मुलांसह पुरवठा कार्यालया बाहेर दरवाजात बसून रेशन द्या रेशन द्या अशा घोषणा देत परिसरात एकाच खळबळ उडवून दिली. या अचानक घडलेल्या आंदोलन नंतर पुरवठा निरीक्षक प्रकाश पाटील यांनी तात्काळ या कुटुंबियांच्या शिधापत्रिकेच्या तपासणी केली असता तिची नोंद ऑनलाईन झाली नसल्याचे लक्षात आल्यावर तात्काळ तशी नोंद करून संबंधित दुकानदार यांना कातकरी आदिवासी कुटुंबास तात्काळ धान्य देण्याचे आदेश दिले.

याबाबत पुरवठा निरीक्षक प्रकाश पाटील यांच्याकडून जाणून घेतले असता, त्यांनी तालुक्यातील बहुसंख्य शिधावाटप पत्रिका संगणकीय प्रणालीशी जोडल्या गेल्या असून ज्यांची नोंद झाली नाही त्या अंत्योदय शिधावाटप पत्रिका धारकांना रजिस्टर मध्ये नोंद करून ऑफलाईन पद्धतीने धान्य देण्या संदर्भात आदेश दिले आहेत. तालुक्यातील कोणत्याही शिधावाटप पत्रिका धारकांना धान्य पासून वंचित न ठेवण्याचा निश्चय पुरवठा निरीक्षक प्रकाश पाटील यांनी बोलून दाखविला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -