घरCORONA UPDATECorona: वांद्रे भाभा हॉस्पिटलमधील १५ कर्मचाऱ्यांना केले क्वारंटाईन

Corona: वांद्रे भाभा हॉस्पिटलमधील १५ कर्मचाऱ्यांना केले क्वारंटाईन

Subscribe

वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलमध्ये बुधवारी सकाळी एका कोरोनाची लागण झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना क्वारंटाईन करण्याची मागणी केली.

वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलमध्ये बुधवारी सकाळी एका कोरोनाची लागण झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना क्वारंटाईन करण्याची मागणी केली. त्यामुळे त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या १५ कर्मचाऱ्यांची चाचणी करून त्यांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय हॉस्पिटल प्रशासनाने घेतला आहे.

हेही वाचा – CoronaVirus: भारतात कोरोनाचे ५ हजार रुग्ण; आरोग्य मंत्रालयाची माहिती

- Advertisement -

काय आहे प्रकरण 

भाभा हॉस्पिटलमध्ये अन्य उपचारासाठी दाखल झालेल्या महिलेचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. त्यानंतर तिचा कोरोना अहवाल आला आणि तो पॉझिटिव्ह निघाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. हॉस्पिटलमधील परिचारिका, कर्मचारी यांनी तातडीने मुख्य वैद्यकीय अधिकरी यांच्या केबिनकडे धाव घेत सर्वाना क्वारंटाईन करण्याची मागणी केली. आमच्या घरी मुलंबाळं आहेत, आम्ही घरी गेलो तर त्यांनाही कोरोनाची लागण होईल, असे सांगत कर्मचाऱ्यांनी क्वारंटाईन करण्याची मागणी लावून धरली. यावर सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्याऐवजी त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांचे नमुने घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हॉस्पिटलमधील १५ कर्मचाऱ्यांचे नमुने घेऊन त्यांना हॉस्पिटलमध्येच क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप जाधव यांनी दिली.

वांद्र्यातील भाभा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू; स्टाफचे आंदोलन

वांद्रेतील भाभा रुग्णालयातील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे आंदोलन; क्वारंटाइन करण्याची केली मागणी

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 7, 2020

- Advertisement -

देशात कोरोनाचा आकडा वाढला 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार भारतामध्ये ५ हजार १९४ कोरोना रुग्ण झाले आहेत. तर ४०१ रुग्णांवर उपचार करून त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. तर भारतामध्ये आतापर्यंत १४९ लोकांना या आजारामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या २४ तासात कोरोनाबाधितांपैकी ३५ जणांचा मृत्यू झाला असून ७७३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे वाढत्या रुग्णांमुळे भारताने कोरोनाग्रस्तांचा ५ हजार हा आकडा पार केला आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -