घरCORONA UPDATECoronaVirus: भारतात कोरोनाचे ५ हजार रुग्ण; आरोग्य मंत्रालयाची माहिती

CoronaVirus: भारतात कोरोनाचे ५ हजार रुग्ण; आरोग्य मंत्रालयाची माहिती

Subscribe

केंद्रीय आरोग्या मंत्रालयाच्या माहितीनुसार भारतामध्ये ५ हजार १९४ कोरोना रुग्ण झाले असून ४०१ रुग्णांवर उपचार करून त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.

भारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आताच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार भारतामध्ये ५ हजार १९४ कोरोना रुग्ण झाले आहेत. तर ४०१ रुग्णांवर उपचार करून त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. तर भारतामध्ये आतापर्यंत १४९ लोकांना या आजारामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या २४ तासात कोरोनाबाधितांपैकी ३५ जणांचा मृत्यू झाला असून ७७३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे वाढत्या रुग्णांमुळे भारताने कोरोनाग्रस्तांचा ५ हजार हा आकडा पार केला आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे.

- Advertisement -

लॉकडाऊन संपणार की वाढणार ?

देशात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असून त्याच पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन १४ एप्रिल रोजी संपत आहे. मात्र त्यानंतरही काही आठवडे लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. हा निर्णय राज्य घेणार आहेत. सध्या महाराष्ट्र, तेलंगणा, पंजाब आणि आता मध्य प्रदेशमध्ये कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झालेला आहे. त्यामुळे या राज्यात लॉकडाऊन अधिक काळ चालेल, अशी शक्यता आहे. तरिही १४ तारीख जवळ आल्यानंतरच याबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो.

हेही वाचा –

अमेरिकेत २४ तासांत २ हजार कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -