घरमुंबईवादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे मुंबईकरांची त्रेधा

वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे मुंबईकरांची त्रेधा

Subscribe

शनिवारी मान्सूनपूर्व पडलेल्या पहिल्या पावसाने मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा दिला. मात्र त्यानंतर एक दिवसाची विश्रांती घेऊन सोमवारी रात्री पुन्हा अचानक कोसळला. यावेळी ढगांच्या गडगडाट व वादळी वाऱ्यासह कोसळलेला पाऊस व त्यात खंडीत झालेली वीज यामुळे मुंबईकरांची चांगलीच त्रेधा तिरपीट उडाली.

रात्री ८ वाजता वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांनी तातडीने घराकडे परतण्यासाठी रेल्वे स्थानक गाठले. यात हार्बरलाईनच्या सीवूड स्थानकावर ओव्हरहेड वायर तुटल्याने व मध्य रेल्वेच्या कांजूर स्थानकातील वीज पुरवठा खंडीत झाल्याने या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

- Advertisement -

सखल भागात पाणी साचले

पश्चिम मार्गावर काही काळ एक नंबर फलाटावरून वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे स्थानकावर प्रचंड गर्दी झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाने मुंबईकरांना झोडपून काढले. तासाभरात १० मी. मीटर पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत मुंबईच्या विविध भागात पाऊस सुरु होता. त्यामुळे मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचल्याने मुंबईकरांची गैरसोय झाली. वादळी वाऱ्यासह पडलेल्या या पावसांत शहरांत २,  पूर्व उपनगरांत ४, आणि पश्चिम उपनगरांत २ ठिकाणी झाड पडले. या घटनेत तीन जण किरकोळ जखमी झाल्याने त्यांना केईएममध्ये दाखल करण्यात आले आहे.

दिवसभरात उन्हाच्या झळांनी तापलेल्या मुंबईला सोमवारी रात्री विजांच्या कडकडाट व ढगांच्यासह पडलेल्या पावसामुळे  मुंबईकरांची दाणादाण उडवून दिली. काही ठिकाणी विद्युत पुरवठाही खंडीत झाला. रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाल्याने कामावरुन घराकडे परतणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच रखडपट्टी झाली. दरम्यान, झाड पडून तीनजण किरकोळ जखमी झाल्याने त्यांना केईएममध्ये दाखल करण्यात आले आहे.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -