घरमुंबईईव्हीएम मशीन बंदीवर राज ठाकरेचं उद्धव ठाकरेंना पत्र

ईव्हीएम मशीन बंदीवर राज ठाकरेचं उद्धव ठाकरेंना पत्र

Subscribe

ईव्हीएम मशीनच्या मुद्दयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. या पत्राला उद्धव ठाकरे नेमकं काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ईव्हीएमवर बंदी आणण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ,पीडीपी, अकाली दल, डीएमके,बिजू जनता दल या पक्षाच्या प्रमुखाना यांना पत्र लिहिलं आहे. ईव्हीएमवर बंदी घालण्याचं आवाहन राज ठाकरेंनी या पत्रातून केलं आहे. मनसेचे सरचिटणीस शिरिश सावंत यांनी माय महानगरला यासंदर्भात माहिती दिली आहे.

ईव्हीएम मशीनवर बंदी आणा

ईव्हीएमवर बंदी आणूया, अन्यथा निवडणुकांवर बहिष्कार घालूया’ असं आवाहन राज ठाकरे यांनी पत्राच्या माध्यमातून केलं आहे. या पत्रात ईव्हीएमवरची विश्वासार्हता संपली आहे. त्यामुळे व्हीव्हीपेड असेल तरचं निवडणूकीसंदर्भात निर्णय घेण्यात यावा. अन्यथा पेपर बेलेट निवडणूका झाल्या पाहिजे अशी राज ठाकरे यांनी पत्रात आपली भूमिका मांडली आहे. हिचं भूमिका राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे ही मांडली आहे.

- Advertisement -

राज ठाकरेंच्या पत्राला उद्धव ठाकरे उत्तर देणार का?

राज ठाकरे यांनी हे पत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ही लिहल्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या पत्राला नेमकं काय उत्तर देतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. विधानसभा निवडणूक २०१४ आणि मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी राज ठाकरे यांनी उद्धव यांच्याकडे युतीचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र शिवसेनेकडून कोणतंही उत्तर आलं नव्हतं. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता तरी ईव्हीएमवर बंदी एकत्रित येतात का याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झालं आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -