घरमुंबईकाकांविरोधात पुतण्या

काकांविरोधात पुतण्या

Subscribe

महाराष्ट्राच्या राजकारणात काका वि. पुतण्या असा उभा वाद सर्वश्रुत आहे. हे कमी म्हणून की काय शरद पवार आणि अजित पवार ही काका पुतण्याची जोडी अजून या वादापासून दूर असल्याचे दिसत असताना मनसेवरून या दोघांमध्ये’मतांची’ बिघाडी दिसून आली.

राज ठाकरेयांना तरुणांचा मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत असते. परंतु, निवडणूक समझोत्याच्या दृष्टीने त्यांच्याशी चर्चा झालेली नाही आणि ती होईल असं दिसतही नाही, असा खुलासाशरद पवारयांनी पंढरपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना केला.मात्र आगामी निवडणुकीत भाजपाविरोधातील मतविभाजन टाळण्यासाठीमनसेने आघाडीसोबत यावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनात मनसेला घेण्याबाबत कितीही इच्छा असली तरी काँग्रेस राज ठाकरे यांना सोबत घेण्यास कधीही तयार होणार नाही, याची कल्पना शरद पवार यांना आहे.

- Advertisement -

मात्र अजित दादांना पुन्हा सत्ता आणायची असेल तर कुठल्याही परिस्थितीत मनसे सोबत असणे गरजेचे वाटते. यामुळे भाजप विरोधी मतांची विभागणी होणार नाही, असे वाटते आणि त्यांनी तसे बोलून दाखवले.प्रत्येक राजकीय पक्षाचा त्यांना मानणारा असा मतदार असतो. गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसेच्या उमेदवारांना लाख लाख दीड लाख मते घेतल्याचे तुम्ही पाहिले असेलच. मनसेबाबत आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी तसेच काँग्रेसने वेगवेगळी मते मांडली आहेत. मात्र असेल असले तरी आगामी निवडणुकीत मोदी सरकारविरोधातील मतविभाजन टाळणे गरजेचे आहे. हे मतविभाजन टाळण्यासाठी सेक्युलर विचार मान्य असलेल्या समविचारी पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. त्यासाठी मनसेने आघाडीसोबत यावे असे मला वाटते, असे अजितदादा म्हणाले.

मनसेशिवाय शेतकरी नेते राजू शेट्टी यांची मनधरणी करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.यावेळी चर्चेच्या गुर्‍हाळात अडकलेल्या शिवसेना आणि भाजपाच्या युतीलाही अजित पवार यांनी कानपिचक्या दिल्या. ’’शिवसेना आणि भाजपाच्या युतीमध्ये सध्या दबावाचे राजकारण सुरू आहे. त्यातून अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्याचा दोघांचाही प्रयत्न आहेत. आता एक दिवस युती झाल्याची बातमी येईल. हिंदुत्ववादी विचारांसाठी आम्ही एकत्र आलो आहोत असे सांगितले जाईल,’’ असे अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

ईशान्य मुंबई, ठाणे आणि नाशिकमधील दिंडोरी या तीन जागा मनसेसाठी सोडल्यास महाआघाडीमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव राज ठाकरे यांनी शरद पवारांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. अलीकडच्या काळात शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्याने राष्ट्रवादीच्या घड्याळाला मनसेचे काटे जोडले जाऊ शकतात, अशी कुजबूजही ऐकू येत होती.

अगदीच तीन नाही, पण दोन जागा मनसेला देऊन शरद पवार नवा मित्र जोडतील, असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु, आघाडीत मनसे नको, अशी काँग्रेसची स्पष्ट भूमिका होती. ती प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि अन्य नेते ती ठामपणे मांडत होते.हे सारे लक्षात घेऊन शरद पवार मनसेवरून बॅकफूटला गेले आहेत. मात्र अजितदादांना मनसे सोबत हवी, असे अजूनही वाटत आहे आणि तीच भावना त्यांनी बोलून दाखवली.

राज ठाकरे यांना आघाडीत घ्यावे
-अजित पवार

मनसेबरोबर चर्चा होईल असे दिसत नाही
-शरद पवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -