घरमुंबईRaj Thackery : फक्त नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा; राज ठाकरेंकडून भूमिका...

Raj Thackery : फक्त नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा; राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट

Subscribe

या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना फक्त मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

मुंबई : दरवर्षीप्रमाणे दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज (9 एप्रिल) गुढी पाडवा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण कुणाशीही युती नाही, जे करायचं ते स्वबळावर, असा निर्धार करणाऱ्या राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादीसोबत महायुतीत सहभागी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशातच राज ठाकरे यांनी म्हटले की, या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना फक्त मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. (Raj Thackeray speech at Shivaji park gudi padwa 2024 Unconditional support to Mahayuti only for Narendra Modi)

उपस्थितांना संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की, या महाराष्ट्रातून पुढे जाताना आपल्याला मार्ग काढायचा आहे. महाराष्ट्र सैनिकांना माझ्यावर विश्वास की, मी योग्य मार्ग दाखवेन. त्यामुळे माझी महाराष्ट्राला आणि मतदारांकडूनही अपेक्षा आहे की, कृपा करून व्याभिचाराला राज मान्यता देऊ नका. ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे. त्याला राजमान्यता मिळाली तर पुढचे दिवस भीषण आहेत, अशी भीती राज ठाकरे यांच्याकडून व्यक्त करण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – Raj Thackery : फक्त नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा; राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट

आजच्या परिस्थितीत मी पाहतो. तेव्हा पुढच्या 50 वर्षाचा विषय डोळ्यासमोर येतो. पण मी मुख्यमंत्री एखनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर मी स्वतंत्रपणे देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली. तेव्हा मी फडणवीसांना स्पष्ट सांगितले की, मला ते सगळं नको, मला या सगळ्या वाटाघाटीच्या भानगडीत पाडू नका. मला विधानपरिषद किंवा राज्यसभाही नको. पण या देशाला खंबीर नेतृत्त्वाची गरज आहे. ती गरज पूर्ण झाली नाही तर राज ठाकरेचे तोंड आहे, हे फडणवीसांना मी स्पष्टपणे सांगितलं. केवळ देशाला खंबीर नेतृत्त्वाची गरज आहे म्हणून काहीही अपेक्षा न ठेवता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आगामी लोकसभा निवडणुकीत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा देत आहे, हे मी जाहीर करतो, अशी भूमिका राज ठाकरे यांनी आजच्या मेळ्याव्यात मांडली.

- Advertisement -

राज ठाकरेंकडून विधानसभा निवडणुकीचे संकेत

मनसैनिकांना आवाहन करताना राज ठाकरे म्हणाले की, सर्व मनसैनिकांना मला एकच सांगायचं आहे की, विधानसभेच्या कामाला लागा. पुढच्या गोष्टी पुढे, पण मी लवकर तुम्हाला भेटायला येत आहे. मला मांडायचं असेल ते मी मांडेल. उद्या कोणाची पकपक झाली, तर मी माझं तोंड उघडले, असा इशारा राज ठाकरे यांनी भाजपा आणि मोदींना दिला. अर्थातच राज ठाकरे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नसले तरी त्यांनी विधानसभा निवडणुकांचे संकेत दिले आहे. तसेच त्यांनी भाजपा आणि मोदींना इशाराही दिला आहे. त्यामुळे आता राज ठाकरे विधासभा निवडणुकीत महायुतीत सहभागी होणार का? आणि झाले तर त्यांना किती जागा मिळणार हे पाहावे लागेल.

हेही वाचा – Raj Thackeray LIVE : मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच अध्यक्ष राहणार! राज ठाकरेंची शिवतीर्थावरुन गर्जना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -