घरमुंबईराज ठाकरे यांचा राष्ट्रवादीला पाठिंबा? १९ मार्चच्या मेळाव्यात मोठी घोषणा

राज ठाकरे यांचा राष्ट्रवादीला पाठिंबा? १९ मार्चच्या मेळाव्यात मोठी घोषणा

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १९ मार्चला पदाधिकाऱ्यांचा मेळावा मुंबई, वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित केला आहे. या मेळाव्यात ते मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १९ मार्चला पदाधिकाऱ्यांचा मेळावा मुंबई, वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित केला आहे. या मेळाव्यात ते मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहेत. राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देऊन नरेंद्र मोदींविरोधात प्रचार करण्याची चिन्हं आहेत. यासंदर्भातलीच ही घोषणा असेल असे वृत्त काही प्रसारमाध्यमातून सांगितले जात आहे. ९ मार्चला झालेल्या मनसेच्या १३ व्या वर्धापन दिनी राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकांबाबत नंतर बोलेन असं म्हणत सस्पेन्स कायम ठेवला. हा सस्पेन्स १९ मार्चला संपण्याची शक्यता असून राज ठाकरे हे राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

मनसेची भूमिका स्पष्ट होणार 

२०१४ मध्ये राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र मोदी सरकरावर नाखुश असल्याचे अनेकदा राज ठाकरे यांनी बोलून दाखवले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मनसे मोदी विरोधी प्रचार करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या मेळाव्यात राज ठाकरे भाष्य करणार असल्याचे समजले जात आहे. त्याशिवाय यंदाच्या निवडणुकीत मनसे किती जागांवर उमेदवार देणार याचाही निर्णय ते सांगतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीकडून मनसेची पाठराखण 

यापूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचं समर्थन केलं होतं. ‘आमच्या मनात जे आहे तेच राज ठाकरेंच्या ओठांवर आहे’, असं वक्तव्य आव्हाड यांनी केलं होत. तर दुसरीकडे याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ‘जे राज ठाकरे यांना पोपट म्हणाले आहेत, सुपारी घेऊन भाषण करणारे म्हणले आहेत, तेच त्यांच्या भाषणामुळे विचलीत झाले आहेत’, अशी टीका आव्हाड यांनी फडणवीसांवर केली होती. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या १३ व्या वर्धापनदिनी केलेल्या भाषाणात पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली होती. तर, याच मुद्द्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये झालेल्या भाजप मेळाव्यात राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. या एकंदर प्रकरणावरत जितेंद्र आव्हाड यांनी ही प्रतिक्रिया दिली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -