घरमुंबई... म्हणून सुषमा अंधारे ठाकरे गटात; रामदास आठवले यांचा टोला

… म्हणून सुषमा अंधारे ठाकरे गटात; रामदास आठवले यांचा टोला

Subscribe

सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले, सुषमा अंधारे आधी आमच्याच पक्षात होत्या. त्यांनी आमच्या पक्षासाठी कामंही केलं. पण सध्या शिवसेनेत कोणी नेता नाही. तसेच सुषमा अंधारे ह्या टीका करण्यात तरबेज आहेत. त्यामुळेच त्यांना शिवसेनेत घेतले आहे. त्यांना उपनेते पद दिले आहे. मात्र वारंवार टीका करणे योग्य नाही. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी वारंवार टीका करु नये, असा सल्लाही मंत्री आठवले यांनी सुषमा अंधारे यांना दिला.

मुंबई: सुषमा अंधारे टीका करण्यात तरबेज आहेत. तसेच शिवसेनेत नेत्यांची कमी आहे. म्हणूनच सुषमा अंधारे यांना शिवसेनेत घेतले आहे, असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे. या वक्तव्यामुळे मंत्री आठवले व सुषमा अंधारे यांच्यात वाक् युद्ध रंगण्याची चिन्हे आहेत.

सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले, सुषमा अंधारे आधी आमच्याच पक्षात होत्या. त्यांनी आमच्या पक्षासाठी कामंही केलं. पण सध्या शिवसेनेत कोणी नेता नाही. तसेच सुषमा अंधारे ह्या टीका करण्यात तरबेज आहेत. त्यामुळेच त्यांना शिवसेनेत घेतले आहे. त्यांना उपनेते पद दिले आहे. मात्र वारंवार टीका करणे योग्य नाही. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी वारंवार टीका करु नये, असा सल्लाही मंत्री आठवले यांनी सुषमा अंधारे यांना दिला.

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकार पाय उतार झाल्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्रात महाप्रबोधन यात्रा सुरु केली. प्रत्येक जिल्ह्यात त्यांची सभा होत आहे. त्यांच्या सभांना प्रतिसादही मिळत आहे. सभेतून सुषमा अंधारे शिंदे गट व भाजपवर टीका करतात. शिंदे गट व भाजप नेते अंधारे यांच्यावर पलटवार करतात. काही जिल्ह्यात तर त्यांची सभा उधळून लावण्याची धमकी देण्यात आली. मात्र त्यांची यात्रा काही थांबली नाही.

मुलुंड येथील सभेत तर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. राज ठाकरे यांनी एका भाषणात उद्धव ठाकरे यांच्या आजारावर भाष्य केले होते. त्याला अंधारे यांनी उतर दिले होते. अशा प्रकारे आजाराविषयी बोलणे योग्य नाही. असे बोलण्यामागे कोणते जनहित आहे, असा सवाल अंधारे यांनी उपस्थितीत केला होता. त्यावर मनसैनिक संतप्त झाले होते. उस्मानाबाद येथील अंधारे यांची सभा उधळून लावण्याची धमकी उस्मानाबादच्या मनसेच्या जिल्हा प्रमुखाने दिली होती. मात्र माझ्या भाषणात काही चुकीचे असल्यास भर सभेत माझ्याशी चर्चा करावी, असे आवाहन अंधारे यांनी केले होते. अशा प्रकारे अंधारे व अन्य नेत्यांमध्ये वाद सुरुच असतात. त्यात आता मंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -