घरताज्या घडामोडीHDFCच्या क्रेडिट कार्ड संदर्भात मोठा निर्णय, वाचा काय होणार परिणाम

HDFCच्या क्रेडिट कार्ड संदर्भात मोठा निर्णय, वाचा काय होणार परिणाम

Subscribe

एचडीएफसीच्या सुविधा जोवर सुधारत नाहीत तोपर्यत डि़जिटल लाँचिंग, नवीन क्रेडिट कार्डचे वाटप थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एचडीएफसी बँकेने एक वर्षापूर्वी एक नवीन App लाँच केले होते. हे App वापरण्यात ग्राहकांना अनेक अडचणी येत होत्या. वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे ग्राहक त्रस्त झाले होते. त्यात बँकेने आणखी योजना वाढविण्याचा प्लान आखला होता. त्या योजना तात्काळ थांबवण्याचे आदेश आरबीआयने एचडीएफसीला दिले आहेत. एचडीएफसीच्या सुविधा जोवर सुधारत नाहीत तोपर्यत डि़जिटल लाँचिंग, नवीन क्रेडिट कार्डचे वाटप थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

App नीट काम करत नसल्याने लाखो ग्राहकांच्या तक्रारी आल्यानंतर एचडीएफसी बँके हे App पुन्हा लाँच करण्यासाठी मोठ्या तयारीला लागले होते. तेवढ्यात RBIने एचडीएफसीला मोठा झटका दिला आहे. गेल्या दोन वर्षांतील
एचडीएफसी बँकेला बसलेला हा तिसरा झटका आहे. आरबीआयकडून २ डिसेंबरला हे आदेश देण्यात आले. मुंबई शेअर बाजारात बँकेने याची माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. गेल्या अनेक महिन्यांपासून एचडीएफसी बँकेची सुविधा ढासळली असल्याचे समोर आले. इंटरनेट बँकिंग आणि इतर पेमेंट सुविधांमध्ये ग्राहकांना सातत्याने समस्या येत होत्या. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. २१ नोव्हेंबरला बँकेच्या इंटरनेट बँकिंग आणि पेमेंट सिस्टिममध्ये मोठी गडबड आढळून आली होती.

- Advertisement -

आरबीआयने दिलेल्या आदेशात बँकेच्या बोर्डाला खडे बोल सुनावले आहेत. उद्भवलेल्या समस्यांचा योग्य तपास करून त्याला जबाबदार कोण असेल हे ठरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बँक जेव्हा या समस्यांवर काम करून समस्या सोडवेल तेव्हाच बँकेवर लावलेले निर्बंध हटविण्यात येतील अशी सक्तीची ताकद आरबीआयने एचडीएफसी बँकेला दिली आहे.

एचडीएफसी बँकेने असे म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांत बँकेची आयटी प्रणाली मजबूत करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे बँकेच्या बॅलेन्सचे काम लवकर बंद करण्याचे काम सुरू ठेवले आहे. बँक नियमाकांसोबतच काम करत राहिल असे एचडीएफसी बँकेने म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरण: NCBचे दोन अधिकारी निलंबित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -