घरमुंबईपदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक, निकाल शुक्रवारीच

पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक, निकाल शुक्रवारीच

Subscribe

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया पुर्ण होऊन निकाल लागण्यासाठी आता शुक्रवार उजाडणार आहे. प्रत्यक्ष मोजणीलाच सुरूवात उशिरा होणार असल्याने हा निकाल उशिरा लागणार हे आता स्पष्ट आहे. खुद्द निवडणुक आयोगातील अधिकाऱ्यांनीही याबाबतचा खुलासा करत निकाल शुक्रवारी लागतील असे स्पष्ट केले आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासूनच या मतमोजणीला सुरूवात झाली आहे.

यंदा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये यंदा अपेक्षेपेक्षाही मोठ्या प्रमाणात असे मतदान झाले आहे. परिणामी मतमोजणीसाठी ३६ तासांपेक्षा जास्त कालावधी लागणार असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि भाजप निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदा आमनेसामने लढल्या. विधान परिषदेची ही निवडणूक म्हणजे राजकीय पक्षांसाठीची लिटमस टेस्ट म्हणूनच ओळखली जाते. राज्यात पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासह, नागपूर पदवीधर, औरंदाबाद पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात निवडणूक पार पडली.

- Advertisement -

अशी आहे टक्कर

महाविकास आघाडी उमेदवार

अमरावती शिक्षक मतदारसंघ – श्रीकांत देशपांडे, शिवसेना
पुणे पदवीधर मतदारसंघ – अरुण लाड, राष्ट्रवादी काँग्रेस
पुणे शिक्षक मतदारसंघ – प्रा. जयंत आसगांवकर, काँग्रेस
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ – सतीश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस
नागपूर पदवीधर मतदारसंघ – अभिजीत वंजारी, काँग्रेस

भाजपचे उमेदवार

अमरावती शिक्षक मतदारसंघ – डॉ. नितीन धांडे
पुणे पदवीधर मतदारसंघ – संग्राम देशमुख
पुणे शिक्षक मतदारसंघ – जितेंद्र पवार (भाजप पुरस्कृत अपक्ष)
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ – शिरीष बोरनाळकर
नागपूर पदवीधर मतदारसंघ – संदीप जोशी

- Advertisement -

 

 

 

 

 

 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -