घरमुंबईRBI रेपो रेट स्थिर; शेअर बाजारात ७९२ अंकाची घसरण, रुपया @७४

RBI रेपो रेट स्थिर; शेअर बाजारात ७९२ अंकाची घसरण, रुपया @७४

Subscribe

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने आज रेपो रेटमध्ये कोणताही बदल होणार नसल्याची घोषणा करताच शेअर बाजारावर त्याचे परिणाम दिसले. शेअर बाजार बंद होताच सेन्सेक्स ७९२ अकांनी तर निफ्टी २८३ अकांनी कोसळला. त्यामुळे आता सेन्सेक्स ३४,३७४ तर निफ्टी १०,३१६ अकांवर बंद झाला आहे.

यामुळे मोठ्या प्रमाणावर शेअर बाजाराचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. मारुती सुझुकी, बजाज फायनान्स, एचडीएफसी आणि आयसीआयसीआ बँकेचे शेअर्समध्ये घसरण झालेली आहे. तर इंधनाच्या मार्केटिंग कंपन्यांचेही शेअर्स १५ अंकानी घसरले आहेत. याचा प्रतिकूल परिणाम रुपयावर झाला असून आज डॉलरच्या तुलनेत रुपयाने ७३.५८ असा नवा उच्चांक गाठला आहे. आरबीआयच्या सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समितीने रेपो रेट ६.५ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ६.२५ टक्के यामध्ये कोणताही बदल केला नाही.

- Advertisement -

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट स्थिर ठेवल्याच्या निर्णयानंतर शेअर बाजारात घसरण दिसून आलीच. त्याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयानेही सर्वाधिक निचांकी स्तर गाठला आहे. आता रुपया ७४.१० वर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती वाढल्यामुळे डॉलरची मागणी वाढली आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून रुपया सावरण्याचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाही आहेत.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -