घरमुंबईखुशखबर! असिस्टंट पदाच्या ६८५ जागांसाठी भरती

खुशखबर! असिस्टंट पदाच्या ६८५ जागांसाठी भरती

Subscribe

पदवीधरांना असिस्टंट पदासाठी अर्ज करता येणार आहे. याकरता ६८५ जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

पदवीधरांना नोकरीची संधी उपलब्ध झाली असून न्यू इंडिया इंश्युरन्स कंपनी लिमिटेडच्या वतीने भरती करण्यात येणार आहे. या कंपनीमध्ये ‘असिस्टंट’ पदांच्या ६८५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून इच्छुकांना या महिन्याच्या अखेरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. तर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १६ जुलै २०१८ पासून सुरू होणार असून याबाबतची सविस्तर माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. सध्या देशामध्ये बेरोजगारीचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. लोकांना नोकरीती नितांत गरज आहे. अशावेळी ६८५ जागांसाठीची भरती पदवीधरांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

अपंगांसाठी विशेष सवलत

असिस्टंट पदासाठीच्या जागा भरतीकरता कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण झालेल्यांना अर्ज करता येणार आहे. तर ३० जून २०१८ पर्यंत २१ ते ३० वयोगटातील लोकांना याकरता अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये अपंग आणि पीडब्ल्यूडीच्या उमेदवारांना १० वर्षांची मुभा देण्यात आली असून अनुसूचित जाती आणि जमातीमधील पदवीधरांना पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे. शिवाय ओबीसीकरताही तीन वर्षांची सूट असणार आहे.

- Advertisement -

दोन पूर्व परीक्षा

पदाच्या अर्जाकरता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नसून असिस्टंट पदासाठी १४ हजार ४३५ रुपये ते ४० हजार ०८० रुपये इतके वेतनमान असणार आहे. उमेदवारांना दोन प्रकारच्या पूर्व परीक्षा द्याव्या लागणार असून यामधील टायर १ ची पूर्व परीक्षा ८ आणि ९ सप्टेंबर २०१८ रोजी तर टायर २ ची पूर्व परीक्षा ६ ऑक्टोबर २०१८ रोजी पार पडणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -